ETV Bharat / bharat

Golden Boy Neeraj Chopra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, म्हणाले... - नीरज चोप्रा ऑलिंपिक रेकॉर्ड

टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 87.58 मीटर भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आहे. या मेडलसोबत ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. आज संपूर्ण देश नीरज चोप्रा (Neeraj Chopra Gold Medal) ने सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल जल्लोष करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 7, 2021, 10:16 PM IST

टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) मध्ये नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 87.58 मीटर भालाफेक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आहे. या मेडलसोबत ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला आहे. आज संपूर्ण देश नीरज चोप्रा (Neeraj Chopra Gold Medal) ने सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल जल्लोष करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (pm modi telephonic conversation neeraj chopra) नीरज चोप्राला फोन करुन त्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - नीरजच्या मन-मनगटात विश्वासाची समर्थ साथ; अंगावर रोमांच! मुख्यमंत्री, पवारांकडून गोल्डन बॉयवर कौतुकाचा वर्षाव

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला फोन लावत पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोबतच असेही म्हणाले की, तु गोल्ड जिंकले म्हणून संपूर्ण देश आनंद व्यक्त करत आहे. पानीपतने पाणी दाखवून दिलं तू.. हे सर्व तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तु देशाचं नाव केलं आहेस. तुझ्यामुळे तरुणांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळेल. टोक्योत आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. तू तर एक सैनिक आहेस, आणखी मुलांना घडवशील यात शंका नाही. तसेच तसेच १५ ऑगस्टला आपण भेटतोय, असेही मोदी म्हणाले.

हेही वाचा - Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

सुवर्ण पदक मिळेल, असे वाटले नव्हते- नीरज चोप्रा

नीरज चोप्रा म्हणाला, की हा अविश्वसनीय अनुभव आहे. पहिल्यांदा भारताला अॅथिलिट्कसमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. इतर खेळांमध्येही आपल्याला केवळ एकच सुवर्णपदक मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया 23 वर्षीय नीरज चोप्राने दिली आहे. हे ऑलिम्पिकमधील खूप दीर्घकाळापासून आपले पहिले ऑलिम्पिक पदक आहे. मला माझा आणि माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. पात्रता फेरीत मी चांगल्या पद्धतीने भाला फेकला. मला माहित होते, की मी खूप चांगल्या पद्धतीने अंतिम पात्रता फेरीत खेळू शकतो. मात्र, सुवर्ण पदक मिळेल, असे वाटले नव्हते. मी खूप आनंदी आहे.

हेही वाचा - Golden Boy Neeraj Chopra : सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.