ETV Bharat / bharat

PM Security Breach : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी; याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी

पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी (PM Security Breach) आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लॉयर्स व्हॉईस नावाच्या संघटनेने (organization called Lawyers Voice) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

PM Modi security Breach
पंतप्रधान सुरक्षा त्रुटी प्रकरणी सुनावणी
author img

By

Published : Jan 10, 2022, 5:53 AM IST

नवी दिल्ली - पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी (PM Security Breach) आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लॉयर्स व्हॉईस नावाच्या संघटनेने (organization called Lawyers Voice) दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

  • मागील सुनावणीत न्यायालयात काय घडलं?

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजादरम्यान वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर मांडले होते. सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. खटल्याशी संबंधित सर्व रेकॉर्ड भटिंडाच्या जिल्हा न्यायाधीशांकडे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश द्यावेत, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत माहिती घ्यावी आणि या सुरक्षा त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावेत, अशी मागणी मनिंदर सिंह यांनी केली. यानंतर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हे सर्व रेकोर्ड सुरक्षित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यावर आज पुन्हा सुनावणी होत आहे.

  • काय आहे प्रकरण?

पंजाबातील शेतकरी संघटनांशी संबंधित निदर्शकांनी पंतप्रधान मोदींच्या वाहनांचा ताफा अडवला होता. त्यानंतरही पंजाब पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप केला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा ताफा फ्लायओव्हरवर 20 मिनिटे खोळंबला होता. या प्रकरणावर पंतप्रधान मोदी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे या गंभीर प्रकाराबद्दल खुलासा मागितला आहे.

  • राष्ट्रपती- पंतप्रधानांची भेट; सुरक्षेतील त्रुटीवर केली चिंता व्यक्त

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 6 जानेवारीला राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ( President RamNath Kovind meets Prime Minister Narendra Modi ) घेतली . राष्ट्रपतींनी त्यांच्याकडून पंजाबमधील त्यांच्या ताफ्यात झालेल्या सुरक्षा त्रुटीची माहिती घेतली आणि चिंता व्यक्त ( President expressed concern about PM Security Breach ) केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.