नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर आज (रविवार, 26 सप्टेंबर) नवी दिल्लीला परतले. पालम विमानतळावर पोहोचल्यानंतर मोदीसमर्थकांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
ढोल आणि नगारा...
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह, माजी आरोग्य मंत्री हर्षवर्धन, दिल्ली भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. ढोल आणि नगारा वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - कमला हॅरिस यांच्या 'या' वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा
संयुक्त राष्ट्रांस केले संबोधित
तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित केले तसेच सुरक्षा संवाद (QUAD) शिखर परिषदेत भाग घेतला. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींचे व्हाइट हाऊसमध्ये अध्यक्ष जो बायडेन यांनी स्वागत केले, ज्यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये ही पहिलीच वैयक्तिक बैठक होती.
कमला हॅरिस यांच्यासोबत बैठक
उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि विविध अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय बैठका घेतल्या. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांचीही भेट घेत घेतली. शिखर परिषदेदरम्यान पीएम मोदींनी कोविड लसीकरण प्रमाणपत्राची परस्पर मान्यता मिळवून एक सामान्य आंतरराष्ट्रीय प्रवास नियम प्रस्तावित केला.
हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीचा वापर कोणत्याही देशाने स्वार्थासाठी करू नये - पंतप्रधान मोदी
उच्चस्तरीय विभागाच्या बैठकीत सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 76व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागाच्या सामान्य चर्चेलाही संबोधित केले.