जयपूर- वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेस गुंग आहे. प्रत्येक दिवस काँग्रेसने वादामध्ये घालविला आहे. काँग्रेस म्हणजे खोटेपणाची दुकान आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राजस्थानमध्ये कमळच उमलणार असल्याचे सांगत भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर आहेत. ते सीकरमधील सभेत बोलत आहेत.
पंतप्रधान मोदी शेखावटीच्या सीकर जिल्ह्यात पीएम मोदी किसान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत. मोदींचा 2 तासांचा कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधितही करणार आहेत. मात्र मोदींच्या आगमनापूर्वीच राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.
अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली नाराजी- मोदींच्या या कार्यक्रमातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पूर्वनिर्धारित 3 मिनिटांचा भाषणाचा कार्यक्रम काढून टाकण्यात आल्यानंतर गेहलोत यांनी सोशल मीडियावरून गेहलोत यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, राजस्थानच्या भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत आहे. माझा पूर्व नियोजित 3 मिनिटांचा संबोधन कार्यक्रम काढून टाकण्यात आल्याने भाषणातून स्वागत करता येणार नाही. ट्विटद्वारे राजस्थानमध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आहे. गेहलोत यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्यादेखील केल्या आहेत.
7 वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करणार- सर्वसाधारण सभेत सुमारे 45 मिनिटांचे भाषण केल्यानंतर पंतप्रधान 1 वाजता सीकरहून हेलिकॉप्टरने जयपूर विमानतळावर पोहोचणार आहेत. तेथून दुपारी दीडच्या सुमारास ते राजकोटला रवाना होणार आहेत. मोदींच्या सभेबद्दल भाजपच्या लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, खासदार सुमेधानंद सरस्वती, खासदार नरेंद्र कुमार, भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर, भजन लाल या नेत्यांनी मोदींच्या दौऱ्याची तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सीकर दौऱ्यावर राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करणार आहेत. तर 7 वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करून विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणाची नवीन संधी उपलब्ध करून देणार आहेत.
मोदी यांचा हा राजस्थानमधील नववा दौरा- गेल्या 9 महिन्याील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा राजस्थानमधील नववा दौरा आहे. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह हेही सक्रिय दिसत आहेत. अशा परिस्थितीत मोदींची शेखावटी भेट भाजपच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. तीन जिल्ह्यांमध्ये जाट मतदारांचे वर्चस्व स्पष्टपणे असल्याने भाजपा या मतदारसंघावर लक्ष करत आहे. शेखावटी हा शेतकरीबहुल परिसर आहे. येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे किसान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करणार आहेत.
हेही वाचा-