ETV Bharat / bharat

PM Modi On India Alliance : आगामी काळात हजारो तरुणांना रोजगार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा

अगामी विधानसभा निवडणुकापूर्वी मध्यप्रदेशात पंतप्रधानांनी नर्मदापुरम जिल्ह्यात 'पॉवर आणि रिन्यूएबल एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर'सह 10 प्रकल्पांची आज पायाभरणी केली. यामुळे बीनामध्ये तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. तसंच यावेळी बोलतांना त्यांनी विरोधकांवर जोरदान टीका केलीय.

PM Modi On India Alliance
PM Modi On India Alliance
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 7:05 PM IST

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिमोटचे बटण दाबून आज बीनामध्ये 50 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळं या बीना औद्योगिक विकासाला ऊर्जा मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पांवर केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान म्हणाले की, येथे ज्या प्रकारे प्रकल्प सुरू आहेत त्यावरून मध्य प्रदेशसाठी आमचा संकल्प किती मोठा आहे, हे दिसून येतं. या सर्व प्रकल्पांमुळं आगामी काळात मध्य प्रदेशातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असा मोदींनी बोलताना दावा केलाय.

50 हजार कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन : यामध्ये बीना रिफायनरी येथील 'पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स' आणि राज्यभरातील 10 नवीन औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान नर्मदापुरम जिल्ह्यात 'पॉवर अँड रिन्यूएबल एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग झोन'सह 10 प्रकल्पांची पायाभरणीही करतील. यामध्ये इंदूरमधील 2 आयटी पार्क, रतलाममधील एक मेगा औद्योगिक पार्क आणि राज्यभरातील 6 नवीन औद्योगिक क्षेत्रांचाही समावेश आहे.

सनातनींनी सावध राहावे : देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक सनातनींनी या देशावर प्रेम केले पाहिजं. या देशाच्या मातीवर प्रेम करणाऱ्यांनी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. सनातनचा नायनाट करून देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचा विरोधकांचा डाव आहे. पण आपण सर्वांनी मिळून अशा शक्तींना रोखायचं आहे. आपल्या संघटनेच्या बळावर तसंच आपल्या एकजुटीनं त्यांचे मनसुबे उधळून लावायचे असल्याचं मोदी म्हणाले.

विरोधी आघाडी देशाचं विभाजन करण्यात व्यग्र : एकीकडं आजचा भारत जगाला एकत्र करण्याची क्षमता दाखवत आहे. जागतिक पटलावर आपला भारत जागतिक मित्र म्हणून पुढे येत आहे, तर दुसरीकडे देशातील समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे काही पक्ष आहेत. त्यांनी मिळून इंडिया आघाडी स्थापन केलीय. काही लोक या इंडिया आघाडीला नेत्यांची नव्हे, तर अहंकारी आघाडी म्हणतात. त्यांच्या नेतृत्वाबाबतही संभ्रम आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत अहंकारी आघाडी कशी चालेल याची रणनीती आखली असल्याचं पंतप्रधांनानी म्हटलंय.

विरोधकांचा भारताच्या संस्कृतीवर हल्ला : अहंकारी आघाडीचं धोरण भारताच्या संस्कृतीवर आघात करणार आहे. भारताला हजारो वर्षापासून एकसंध ठेवणाऱ्या विचार, मूल्ये, परंपरा नष्ट करण्याचा इंडिया आघाडीचा निर्णय आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणेनं कानाकोपऱ्यात देशाचं सामाजिक कार्य केलं. या अहंकारी आघाडीनं महिलांच्या उत्थानासाठी, देशाच्या श्रद्धेचं रक्षण करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ती परंपरा संपविण्याचा संकल्प केला आहे.

हेही वाचा -

  1. PM Modi on INDIA Alliance : इंडिया आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे; पंतप्रधान मोदींची टीका
  2. Boat Capsized in Bihar : बागमती नदीत शाळकरी मुलांची बोट उलटली, अनेक मुलं बेपत्ता
  3. SC Directs MHA On Media Trial : मीडिया ट्रायलवर सर्वोच्च न्यायालयानं दिले केंद्रीय गृह मंत्रालयाला निर्देश, सांगितली 'ही' सुधारणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.