ETV Bharat / bharat

PM Modi Message to BJP Cadre : पठाण चित्रपटाचा वाद; अनावश्यक चर्चा टाळण्याच्या पंतप्रधान मोदींच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत

शाहरूख खानच्या पठाण चित्रपटातील गाण्यावरुन सध्या चांगलाच वाद उफाळून आला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना चित्रपटावर कोणतेही भाष्य न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजप नेत्यांनी कोणत्याही चित्रपटांवर अनावश्यक चर्चा टाळण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत दिला आहे.

PM Modi Message to BJP Cadre
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 18, 2023, 11:08 PM IST

नवी दिल्ली - मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही चित्रपटांवर अनावश्यक वक्तव्ये करणे टाळावे अशा सूचना दिल्या. बैठकीत पंतप्रधान मोदींनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे नाव न घेता याबाबत माहिती दिली. दिवसभर काही नेते चित्रपटांवर विनाकारण वक्तव्य करतात. मग दिवसभर वृत्तवाहिन्यांवर तीच चर्चा सुरू असते, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. सध्या नागरिकांमध्ये शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरुन उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

पठाण चित्रपटातील गाण्यावरुन सुरू आहे वाद : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भुमिका असलेला पटाण हा चित्रपट काही दिवसांपासून विरोधाचा सामना करत आहे. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे 12 डिसेंबरला रिलीज झाले. या वादग्रस्त गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी या चित्रपटाच्या विरोधात आघाडी उघडली आहे.

भगवा आहे देशाचा अभिमान : भाजपच्या अनेक नेत्यांनी दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या कपड्यावरुन या चित्रपटावर टीका केली. यात मध्य प्रदेशचे भाजप मंत्री नरोत्तम मिश्रा, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतरांनी दीपिकाने भगवे कपडे परिधान केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. भगवा हा आपल्या देशाचा अभिमान आहे. हा रंग राष्ट्रध्वजावरही आहे, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत असा रंग दाखवणे आक्षेपार्ह असल्याचेही भाजप नेत्यांचे मत आहे.

काय आहे गाण्याचा वाद : या चित्रपटात असलेल्या बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. त्यामुळे वादळ निर्माण झाले होते. अश्लील पद्धतीने नृत्य करत भगव्या रंगाचे कपडे घातल्याने दीपिकावर टीका करण्यात येत आहे. चित्रपटातून हे गाणे काढून टाकण्याची मागणी भाजपचे नेते करत आहेत. त्यासाठी भाजपचे देशभरात आंदोलनेही सुरू आहेत.

सेन्सॉर बोर्डाने चालवली कैची : भाजपच्या प्रचंड विरोधानंतर या चित्रपटात असलेल्या वादग्रस्त गाण्यातील दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने कैची चालवली आहे. सेन्सॉर बोर्डाने पठाणच्या निर्मात्यांना गाण्यात बदलही सुचवले होते. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना निर्मात्यांनी या गाण्याची छाटणी केली आहे. आता गाण्यात किती बदल झाला आहे, हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशीच कळणार आहे.

हेही वाचा - Dr Sadiccha Sane Missing Case : डॉक्टर मुलीच्या बेपत्ता प्रकरणी अंगरक्षकाच्या सहकाऱ्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.