नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत सज्ज झाला आहे. भारत यजमानपद भूषवत असलेल्या या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO च्या प्रमुखांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान आज भूषणवणार आहेत. या बैठकीत दहशतवाद, प्रादेशिक सुरक्षा आणि समृद्धी हे प्रमुख मुद्दे अजेंड्यावर असणार आहेत.
अद्याक्षरांपासून बनले परिषदेचे नाव : SCO-SECURE च्या भारताच्या अध्यक्षपदाची थीम PM मोदींनी 2018 च्या SCO क्विंगदाओ शिखर परिषदेत तयार केलेल्या संक्षेपातून घेतली आहे. याचा अर्थ S सुरक्षा, E आर्थिक विकास, C कनेक्टिव्हिटी, U एकता, R सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर, E पर्यावरण संरक्षण असे अक्षरे घेण्यात आली आहेत.
भारताने युद्धाचा केला आहे निषेध : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेही या आठवड्यात होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा वाद चिघळत असतानाच हे व्लादिमीर पुतिन परिषदेत सहभागी होत आहेत. भारताने युद्धाचा निषेध केला आहे पण कोणत्याही व्यासपीठावर रशियाच्या विरोधात मतदान केलेले नाही. गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या SCO शिखर परिषदेत अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे युद्धाचे युग नाही, असे विधान व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बोलताना केले होते.
पंतप्रधान मोदींनी केले व्लादिमीर पुतिन यांच्याशी संभाषण : यापूर्वी 30 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले होते. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) आणि G20 यासह द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली होती. सर्व SCO सदस्य देश, चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांना या परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
इराण, बेलारूस आणि मंगोलिया या देशांना निरीक्षक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत इराण, बेलारूस आणि मंगोलिया या देशांना निरीक्षक देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या SCO परंपरेनुसार तुर्कमेनिस्तानला अध्यक्षपदाचे पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. दोन SCO संस्थांचे प्रमुख, सचिवालय आणि SCO RATS देखील उपस्थित असणार आहेत.
चीनसोबतचा संघर्ष सुरूच : शिखर परिषदेचे प्रमुख आकर्षण असलेल्या पाकिस्तान आणि चीनने या परिषदेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने जागतिक स्तरावर एकाकी पडलेला पाकिस्तान या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. गल्वान मुद्द्यावरून चीनसोबतचा संघर्ष सुरूच आहे. वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार अमेरिका दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसोबत सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आवश्यक असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -