दिल्ली - काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतवृत्वाखाली महागाई, बेरोजगारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी, सीबीआयकडून सुरु असलेल्या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं होते. हे आंदोलन करताना सर्वांनी काळे कपडे परिधान केल होते. त्यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बुधवारी निशाणा साधला आहे. काही जण आता काळ्या जादू कडे वळाले आहेत. 5 ऑगस्टला काही जणांनी काळी जादू पसरवण्याचा प्रयत्न केला, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लगावला ( PM Modi Hits Congress ) आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पानीपत येथे येथे 909 कोटी रुपये खर्चून 35 एकरांवर उभारलेल्या (2G) इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. सरकारविरुद्ध खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. त्याच नैराश्यातून हे लोक आता काळ्या जादूकडे वळाले आहेत. काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला ते आम्ही 5 ऑगस्टला पाहिलं. त्यांना असं वाटतं की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल. मात्र, त्यांना हे माहित नाही की त्यांनी कितीही फुशारकी मारली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही निर्माण होणार नाही, अशी टीका पंतप्रधानांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे.
प्रियंका गांधी यांची पंतप्रधानांवर टीका - पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर साधलेल्या निशाण्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी जी इकडची तिकडची गोष्टी करु नका, हे सांगा महागाई वाढवून का लुटत आहेत. जनतेला काळ्या कपड्यांशी घेणदेण नाही आहे, तुमच्या दयाळूपणावर प्रश्न उपस्थित होत आहे, असे प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
-
..@narendramodi जी
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आप इधर उधर की बात न करें, ये बताएं महंगाई बढ़ाकर क्यों लूटा
जनता को काले कपड़ों से गिला नहीं, आपकी रहबरी पर सवाल है।
">..@narendramodi जी
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 10, 2022
आप इधर उधर की बात न करें, ये बताएं महंगाई बढ़ाकर क्यों लूटा
जनता को काले कपड़ों से गिला नहीं, आपकी रहबरी पर सवाल है।..@narendramodi जी
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 10, 2022
आप इधर उधर की बात न करें, ये बताएं महंगाई बढ़ाकर क्यों लूटा
जनता को काले कपड़ों से गिला नहीं, आपकी रहबरी पर सवाल है।
जयराम रमेश यांचंही ट्वीट - ते काळा पैसा आणण्यासाठी काहीही करू शकले नाहीत, आता ते काळ्या कपड्यांबाबत निरर्थक मुद्दा काढत आहेत. देशाला पंतप्रधानांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलावे असे वाटते, पण जुमलेबाज पंतप्रधान मोदी काहीही बोलत राहतात, असे ट्वीट काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी करत पंतप्रधानांवर हल्लोबोल केला आहे.
-
ये काला धन लाने के लिए तो कुछ कर नहीं पाए, अब काले कपड़ों को लेकर बेमतलब का मुद्दा बना रहे हैं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
देश चाहता है कि प्रधानमंत्री उनकी समस्याओं पर बात करें लेकिन जुमला जीवी कुछ भी बोलते रहते हैं। pic.twitter.com/YZNN8TCrCs
">ये काला धन लाने के लिए तो कुछ कर नहीं पाए, अब काले कपड़ों को लेकर बेमतलब का मुद्दा बना रहे हैं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 10, 2022
देश चाहता है कि प्रधानमंत्री उनकी समस्याओं पर बात करें लेकिन जुमला जीवी कुछ भी बोलते रहते हैं। pic.twitter.com/YZNN8TCrCsये काला धन लाने के लिए तो कुछ कर नहीं पाए, अब काले कपड़ों को लेकर बेमतलब का मुद्दा बना रहे हैं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 10, 2022
देश चाहता है कि प्रधानमंत्री उनकी समस्याओं पर बात करें लेकिन जुमला जीवी कुछ भी बोलते रहते हैं। pic.twitter.com/YZNN8TCrCs
हेही वाचा - Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या जीवाला धोका, सर्व खटले दिल्लीत हस्तांतरित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय