अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह मंगळवारी एका मानहानीच्या खटल्यात कोर्टात हजर राहणार होते. परंतु, समन्स स्पष्ट नसल्याने ते हजर झाले नाही. या प्रकरणाचे वकील अमित नायक यांनी सांगितले की, न्यायालयाने 15 एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी या खटल्याची तारीख होती. मात्र समन्समध्ये स्पष्टता नसल्याने या प्रकरणात पुन्हा दोन्ही आरोपींना समन्स पाठवण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत.
'तक्रारीची प्रत पाठवा' : या प्रकरणातील तक्रारीची प्रत त्यांना पाठवावी, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात संजय सिंह आणि केजरीवाल दोघेही आरोपी आहेत. मात्र, याप्रकरणी दोन्ही नेत्यांवर काय कारवाई होणार हे पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीतून स्पष्ट होणार आहे.
काय आहे प्रकरण? : येथील नामदार न्यायालयाने 15 एप्रिल रोजी गुजरात विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने दाखल केलेल्या फौजदारी बदनामीच्या तक्रारीत अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांना 23 मे रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयेश चौथिया यांच्या न्यायालयाने फौजदारी मानहानीच्या तक्रारीत वरिष्ठ नेत्यांना समन्स बजावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीबाबत गुजरात विद्यापीठाविरुद्ध त्यांनी केलेल्या 'व्यंग्यात्मक' आणि 'अपमानजनक' विधानांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी वकिलांचा आरोप : गुजरात हायकोर्टाने विद्यापीठाला पंतप्रधान मोदींच्या पदवीची माहिती देण्याचे मुख्य माहिती आयुक्तांचे आदेश नाकारले. पत्रकार परिषद आणि ट्विटर हँडलवर मोदींच्या पदवीवरून विद्यापीठावर निशाणा साधत असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. त्यांच्या विद्यापीठाला लक्ष्य करणाऱ्या टिप्पण्या बदनामीकारक असून त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचते, असा दावा त्यांनी केला होता.
हेही वाचा :