नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सोशल मीडिया हँडलवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील प्रोफाईलवर भारतीय ध्वज ‘तिरंगा’ ठेवला आहे. यासोबत त्यांनी देशातील जनतेला आपला प्रोफाईल बदलून तेथे तिरंगा ध्वजाचे फोटो ठेवण्याचे आवाहन केले आहे. या अनोख्या अभियानात जनतेने पाठिंबा द्यावा,असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
#HarGharTiranga अभियानात, आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील डीपी बदलूया आणि या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊया. ज्यामुळे आपल्या प्रिय देशाशी आपले नाते अधिक घट्ट होईल, अशा आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर केली आहे.
पंतप्रधान मोदींचे आवाहन : देशातील लोकांना देशभावनेशी जुडून राहावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यात ते नागरिकांचा समावेश करून घेत असतात.शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी देशातील लोकांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले की, भारतीय ध्वज हे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. लोकांनी तिरंगा या ध्वजासह आपले फोटो ‘हर घर तिरंगा’ वेबसाइटवर अपलोड करावेत असेही त्यांनी आवाहन करताना सांगितले.
हर घर तिरंगा : पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले की, तिरंगा ध्वज हा स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्रतीक आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे. राष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी तिरंगा आपल्याला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देत असतो.यात त्यांनी नागरिकांना 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, मी सर्वांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करतो. तिरंग्यासह तुम्ही तुमचे फोटो https://harghartiranga.com या वेबसाइटवर अपलोड करा.
स्वातंत्र्यदिन सोहळा : दरम्यान यावर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 1 हजार 800 विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत जागोजागी तपासणी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनी सुरक्षा उपाय वाढवली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-