ETV Bharat / bharat

आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देशासाठी काम करा, पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन

देशाच्या स्वांतत्र्यासाठी आसामच्या जनतेने आणि तरुणांनी काम केले. आता नव्या भारतासाठी आत्मनिर्भर देशासाठी काम करा, असे मोदी म्हणाले. आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींनी व्हर्च्युअली या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jan 22, 2021, 1:33 PM IST

नवी दिल्ली - नव्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाच्या माध्यमातून काम करा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना केले. देशाच्या स्वांतत्र्यासाठी आसामच्या जनतेने आणि तरुणांनी काम केले. आता नव्या भारतासाठी आत्मनिर्भर देशासाठी काम करा, असे मोदी म्हणाले. आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. मोदींनी व्हर्च्युअली या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

ईशान्य भारतात विकासकामांना गती -

कोरोना काळात आत्मनिर्भर भारत अभियान आपला मंत्र बनला होता. सध्या सरकार ईशान्य भारतात अनेक विकास कामे करत आहे. संपर्क व्यवस्था, आरोग्य, शिक्षणासह पायाभूत सुविधांवर सरकार काम करत आहे. नव्या संधींचा पूरेपूर फायदा घ्या, असे मोदी तरुणांना उद्देशून म्हणाले.

तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर

तळागळातील जनतेसाठी तेजपूर विद्यापीठातील विद्यार्थी नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करत आहेत. तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करत आहेत. यामुळे स्थानिक वस्तूंचा बोलबाला वाढत आहे. 'लोकल फॉर व्होकल' हा नारा सत्यात उतरत आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संशोधनामुळे स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास मदत होत आहे. विकासाची नवे दालने खुली होत आहेत, असे मोदी म्हणाले.

कचऱ्याचे रुपांतर उर्जेत करण्यात येत असल्याचा प्रकल्प स्तुत्य आहे. पिकांचा टाकाऊ भाग शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठीही मोठे आव्हान आहे. सेंद्रिय खते आणि बायो गॅसवर विद्यार्थी चांगले काम करत आहेत. सेंद्रिय खतांमुळे देशापुढील खतांची अडचण दुर होईल, असे मोदी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.