नवी दिल्ली : अदानी मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे म्हणत, मोदी सरकारने यावर संसदेत चर्चा होऊ द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच, मी 2-3 वर्षांपासून हा मुद्दा सतत मांडत आहे. मात्र, यावर बोलू दिले जात नाही असही राहुल यावेळी म्हणाले आहेत. सरकारचा फक्त 'हम दो, हमारे दो' असाच अजेंडा राहीलेला आहे असा टोलाही राहुल यांनी यावेळी लगावला आहे. तसेच, अदानींवर संसदेत चर्चेची मोदी सरकारला भीती वाटते असही राहुल गांधी म्हणाले आहेत.
दूध का दूध आणि पाणी का पाणी : अदानी वादावर सरकारकडून जाब विचारत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद संकुलातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. खासदारांनी 'अदानी-मोदी में यारी है, पैसे की लूट जरी है’, 'एलआयसी बचाओ' आणि 'नही चलगी और बेमानी, बस करो मोदी-अदानी' अशा घोषणा असलेले कार्ड हातात घेतले होते. युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरून देशभरात निदर्शने केली आहेत.
सभागृहाचे कामकाज तहकूब : लोकसभेत तसेच राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावरून निदर्शने केली. या गदारोळात अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले की, तुम्ही बाहेरच्या हेतूने चर्चेसाठी एकाची निवड करत आहात हे योग्य नाही. मी तुम्हाला आवाहन करतो, सामान्य माणूस काय विचार करत आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे मत धनखड यांनी यावेळी मांडले. परंतु, हा गोंधळा चालूच होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज उद्या मंगळवारपर्यंत अध्यक्षांनी तहकूब केल्याचे सांगितले.
दूध का दूध पाणी का पाणी : मी सरकारबद्दल खूप दिवसांपासून म्हणत आलो आहे की 'हम दो, हमारे दो'. आता मोदीजी अदानीजींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. हा मुद्दा मी २-३ वर्षांपासून मांडत आहे. यामध्ये दुध का दूध पाणी का पाणी व्हावे अशी आमची मागणी आहे. आणि त्यामुळेच आम्ही या मुद्यावर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी करत आहोत. लाखो कोटींचा भ्रष्टाचार होऊनही चर्चा होत नाही असे कसे चालेल असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केली आहे.
पंतप्रधान मोदींकडून मागितले उत्तर : या मुद्द्यावर सभागृहातही चर्चा व्हायला हवी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधीच्या प्रश्नांवर उत्तर द्यावेच अशी मागणही राहुल गांधी यांनी केली आहे. अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल प्रसिद्ध केला असून, अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, अदानी उद्योग समूहात गेल्या अनेक दिवसांपासून मोठी उलथापालथ झाल्याच्या बातम्या येत असल्याने यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : भूकंपामुळे तुर्की-सीरियामध्ये प्रचंड विध्वंस; क्षणात होत्याचं नव्हतं झालं