ETV Bharat / bharat

Plastic Bottles Into Yarn : इथं टाकाऊ प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बनवला जातो धागा!

Plastic Bottles Into Yarn : तामिळनाडूच्या तिरुपूर येथील एक वस्त्र उत्पादक कंपनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून धागा तयार करते. अशाप्रकारे, ही कंपनी दररोज तब्बल ७० लाख बाटल्या रिसायकल करते. वाचा ही स्पेशल स्टोरी..

Plastic Bottles Into Yarn
Plastic Bottles Into Yarn
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 10:45 PM IST

पाहा व्हिडिओ

तिरुपूर (तामिळनाडू) Plastic Bottles Into Yarn : आजच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी रिसायकलिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र तरीही समाजामध्ये याबाबत पुरेशी जागरूकता दिसत नाही. अशा परिस्थितीत, तामिळनाडूच्या एका कंपनीनं हा विडा उचलला आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांपासून कृत्रिम धागा : तिरुपूर येथील वस्त्र आणि धागा तयार करणारी सुलोचना कंपनी टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांपासून धागा बनवते. विशेष बाब म्हणजे, ही कंपनी तब्बल ८६ वर्ष जुनी आहे! सध्या ही कंपनी टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून कृत्रिम धागा तयार करण्याचं तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवत आहे. यासाठी देशाच्या विविध भागातून दररोज ७० लाख कचऱ्यात फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणल्या जातात. या प्लास्टिकच्या बाटल्यांचं कंपनीतील चार मोठ्या मशिनमध्ये सिंथेटिक फायबरमध्ये रूपांतर केलं जातं. चार स्टेप्समध्ये हे काम केलं जातं.

कशाप्रकारे केलं जातं : पहिली पायरी म्हणजे टाकाऊ बाटल्यांना बारीक करून त्याचं रुपांतर गोळ्यांमध्ये करणं. या गोळ्या वाळवल्यानंतर वितळवल्या जातात. जेव्हा त्या वितळतात, तेव्हा त्यात आवश्यक रंग जोडले जातात. याद्वारे सिंथेटिक धागा ७० रंगात तयार करून त्याचं कापसात रूपांतर केलं जातं. पुढची पायरी म्हणजे सिंथेटिक तंतूंचं यार्नमध्ये रूपांतर करणं. यार्नवर पॉलिस्टर फॅब्रिकमध्ये प्रक्रिया केली जाते, जी नेहमीप्रमाणे विणली जाऊ शकते. शेवटी हे कापड आवश्यक आकारात शिवून निर्यातीसाठी पाठवलं जातं.

दररोज ७० लाख बाटल्या रिसायकल होतात : अशा प्रकारे २० ते ४० बाटल्या वितळवून एक टी शर्ट बनवता येतो. अशा प्रकारे कंपनी दररोज ११० टन सिंथेटिक पॉलिस्टर धाग्याचं उत्पादन करण्यासाठी ७० लाख प्लास्टिकच्या बाटल्या वापरते. याबाबत कंपनीच्या सीईओ सबरी गिरीश म्हणाल्या की, 'आम्ही दररोज ७० लाख बाटल्या रिसायकल करतो आणि त्यांना पॉलिस्टर धाग्यात बदलतो. यामुळे पैशांची बचत होते आणि पर्यावरणाचंही रक्षण होतं'.

९६ टक्के कार्बन न्यूट्रल कंपनी : 'या पॉलिस्टर फायबरचा वापर केवळ तयार कपड्यांसाठीच नाही तर चटई उत्पादन आणि कारच्या स्पेअर पार्ट उत्पादनासाठीही केला जातो. कंपनीत येणाऱ्या १०० टक्के टाकाऊ बाटल्या रिसायकल केल्या जातात. पर्यावरणदृष्ट्या संरक्षित, पुनर्नवीनीकरण केलेल्या सिंथेटिक धाग्यापासून बनवलेले कपडे पाश्चात्य व्यापारी उत्सुकतेनं विकत घेतात. आम्ही सध्या ९६ टक्के कार्बन न्यूट्रल कंपनी म्हणून काम करत आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

  1. Bhopal Unique library : झोपडपट्टीतल्या मुलीची कमाल, भंगाराचं साहित्य वापरून बनवली अनोखी लायब्ररी!
  2. Blind Man Farming : लहानपणीच गेली दृष्टी; जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर करतोय शेती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.