चेन्नई: नवीन चक्रवर्ती हा सालेम किचिपलायम येथील तरुण पदवीधर आहे. सेवापेठेतील संजय प्रकाश हा त्याचा मित्र आहे. या दोघांनी सालेम येथील चेट्टीचावडी येथे भाड्याने घर घेतले. तेथे त्यांनी यूट्यूब पाहिला आणि स्वत:च्या बंदुका बनवल्या. त्यांनी बंदुक बनवण्याची सर्व साधने भाड्याच्या घरात ठेवली आणि स्फोटकेही ठेवली. याप्रकरणी गेल्या मे महिन्यात वाहन तपासणीदरम्यान दोन्ही तरुणांना संशयावरून ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास केला होता. तेव्हा त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ते ज्या घरी राहत होते त्या घरी गेले. तेथे पिस्तूल, बंदूक बनवण्याची साधने, चाकू, मास्क आणि स्फोटके सापडली. ती जप्त केली आहेत.
सुरक्षा यंत्रणांनी यानंतर कसूच चौकशी करण्यासा सुरुवात केली. त्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या. निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी आपण बंदुका तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्रा यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना शस्त्रास्त्र आणि स्फोटके कायद्यांतर्गत अटक करून तुरुंगात पाठवले. याप्रकरणी ओमाळूर पोलिसांनी दोन दिवस पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.
या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना साथ देणाऱ्या कपिलर या महाविद्यालयीन मित्राला पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) हे प्रकरण आता तपासासाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी केलेल्या प्राथमिक तपासात त्यांनी एलटीटीई सारखी संघटना तयार करून सशस्त्र संघर्ष करण्याची योजना आखल्याचे समोर आले आहे Plan to creat an organization like LTTE.
यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल करून प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याबाबत तपास अधिक तीव्र केला आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांचीही ते चौकशी करत आहेत.