कोलकाता: पियाली बसाक ऑक्सिजन सिलेंडरशिवाय एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारताची पहिली महिला गिर्यारोहक ठरली. पियाली बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील चंदननगर येथील आहे. दुसऱ्या प्रयत्नात तीने हे यश मिळवले. या आधिच्या वेळीही ती शिखराच्या अगदी जवळ पोहोचली होती.
![Piyali Basak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15355569_rotary.jpg)
पियाली बसाक (फोटो: ट्विटरवरून)
![Piyali Basak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15355569_photo.jpg)
पियाली बसाक (फोटो: ट्विटरवरून)
![Piyali Basak](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15355569_rotary2.jpg)
पियाली बसाक (फोटो: ट्विटरवरून)
काही दिवसांपूर्वी अशीही बातमी आली होती की, 12 लाख रुपये जमा न केल्यामुळे तीचे स्वप्न अपूर्ण राहिले. तिने धौलागिरी पर्वतही सर केलेलाआहे.