ETV Bharat / bharat

Diwali Food and Recipe : दिवाळीत परफेक्ट 'महाराष्ट्रीयन फराळ' बनवण्यासाठी ही रेसिपी नक्की पाहा - दिवाळी फराळाची रेसिपी

दिवाळी जवळ आली आहे. सर्व गृहीनी दिवाळीचे नवनवे पदार्थ बनवण्याकडे लक्ष घालत ( Diwali Food and Recipe ) आहेत. पण आज महिला पारंपारिक पदार्थांकडे दुर्लक्ष करून नवे पदार्थ बनवत आहेत. १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम यांची पत्नी सीता यांच्यासोबत अयोध्येत आले होते. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी पारंपारिक पदार्थ घेऊन आलो आहोत. दिवाळी फराळाची रेसिपी ( How to make Diwali snacks ) पाहूयात.

Diwali Food and Recipe
Diwali Food and Recipe
author img

By

Published : Oct 12, 2022, 1:04 PM IST

नवी दिल्ली - स्वादिष्ट काजू कतरी, ते दवाळीच फराळ सभोवतालची मेजवानी सर्वात प्रिय भारतीय सणांपैकी एक आहे. दिवाळीच्या मेजवानीचा कल मिठाईंकडे जरा जास्तच झुकलेला आहे. बर्‍याच महाराष्ट्रीय लोकांसाठी, दिवाळीच्या खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे फराळचा नाश्ता, ज्यामध्ये चवदार आणि गोड स्नॅक्स ( Diwali Food and Recipe ) असतात. चला तर मग दिवाळी फराळ कसे करतात ते पाहूयात, त्याशिवाय दिवाळी फराळात कोणत्या पदार्थांचा समावेश ( Diwali snacks recipe ) आहे ते पाहूयात.

1. चकली - याला दक्षिण भारतात मुरुक्कू म्हणूनही ओळखले जाते. तांदळाच्या पिठापासून बनवलेला हा कुरकुरीत नाश्ता केवळ खुसखुशीत, स्वादिष्ट आणि सोपाच नाही तर दिसायलाही आकर्षक आहे. हा विविध व्हराईटीजमध्ये बनवला जातो. गोड, तिखट, खारटअशा फ्लेवरमध्ये चखली बनवली जाते. तांदळाच्या पिठात तिखट, मीठ, जिरे, तीळ, हळद, चकली मसाला घालून गरम पाण्यात सर्व गोष्टी मिक्स करा. त्यानंतर चकली साच्यात तयार केलेली कचली तेलात तळा.

2. शंकरपाळी - शंकरपाळी हा सर्वात लोकप्रिय महाराष्ट्रीयन फराळांपैकी एक आहे. सणांमध्ये पारंपारिकपणे त्याचा आस्वाद घेतला जातो. याला गुजरातीमध्ये शक्करपारा आणि बंगालीमध्ये शकरपारा असेही म्हणतात. शंकरपाळी ही दूध, साखर किंवा मीठ, तूप, रवा आणि मैदा मिसळून बनवलेला गोड पदार्थ आहे. शंकरपाळी आंबट, गोड किंवा खारट असू शकते. हा पदार्थ दीर्घकाळ टिकतो.

3. लाडू - कोणता भारतीय उत्सव लाडूशिवाय पूर्ण होतो? रवा आणि काही कुरकुरीत ड्रायफ्रुट्स घालून बनवलेले हे स्वादिष्ट लाडू केवळ स्वादिष्टच नाहीत तर दीर्घकाळ टिकणारेही आहेत. रवा भाजून त्यात सर्व प्ररकारचे ड्राय फ्रूट घाला. त्यानंतर साखरेच्या पाकात रवा मिक्स करा आणि लाडू वळून घ्या.

4. करंजी - करंजी बनवण्यासाठी मैद्याच्या पिठाचे छोटे गोळे करून ते लाटा. त्यानंतर तिळ, गुळ, ड्रायफ्रूट घालून चांगले मिश्रण बनवा. ते मिश्रण लाटलेल्या गोळ्यांमध्ये घाला. त्याला विशिष्ट आकार दिला जातो. त्यानंतर गरम तेलात ते तळा. करंजीला गुजियाची महाराष्ट्रीय आवृत्ती म्हणता येते किंवा गोड तळलेले डंपलिंग म्हणा

5. भाकरवडी - एक प्रसिद्ध गोड आणि मसालेदार नाश्ता, भाकरवडी बेसनाच्या पीठाने बनविली जाते. ज्याचा आकार गोल स्वरूपात केला जातो. त्यात तीळ आणि खसखस लाला तिखट थोडे गोड यांचे मिश्रण असते. या तळलेल्या आणि कुरकुरीत स्नॅकचे शेल्फ लाइफ जास्त आहे. ते अनेक आठवडे साठवले जाऊ शकते. भाकरवडी बेसनाच्या पीठाने बनवली जाते आणि एक स्वादिष्ट दिवाळी फराळ आहे.

6. चिवडा - हा बेसन किंवा चण्याच्या पिठापासून बनवलेला कुरकुरीत फराळ आहे. आधी बेसनच्या पिठात तिखट मीठ घालून शेव पाडा. त्यानंतर ती शेव मुरमुरे, हळद आणि चिरलेली कोथिंबीर, कांदा, शेंगदाणे, खोबरे, मिरची, आणि ईतर जिन्नस घालून बनवतात. कढीपत्ता आणि मनुका टाकूनही चिवडा करू शकता. यात सर्व गोष्टी तेलात फ्राय करतात. आणि फराळ हवा बंद डब्यात ठेवावा. ज्यानेकरून चिवड्याला हवा लागून नये. आणि ते सादळू नये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.