ETV Bharat / bharat

Sabarimala Accident: सबरीमाला यात्रेकरूंचे वाहन दरीत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू - सबरीमाला यात्रेकरूंचे वाहन दरीत कोसळून

सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारे वाहन पलटी होऊन दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Sabarimala pilgrims Accident) मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घटना केरळध्ये कुमिली-कुंबम येथे घडली.

सबरीमाला यात्रेकरूंचे वाहन दरीत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 24, 2022, 7:43 AM IST

व्हिडिओ

इडुक्की (केरळ) - सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जाणारे वाहन दरीत कोसळून आठ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Sabarimala pilgrims) काल शुक्रवार (दि. २३ डिसेंबर)रोजी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. तामिळनाडूतील यात्रेकरूंना घेऊन जाणारे हे वाहन केरळमध्ये कुमिली-कुंबम रस्त्यावरून जात असताना दरीत पलटी झाले.

या गाडीत एका लहान मुलासह 10 जण होते. दोन जखमींना कुमिली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसचे, या गाडीत तीनजण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. इडुक्की जिल्हाधिकारी बचाव कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.