ETV Bharat / bharat

Pegasus snooping row : पेगासस स्पायवेअरबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, भारत-इस्रायल संरक्षण कराराची चौकशी करण्याची मागणी - भारत-इस्रायल संरक्षण कराराची चौकशी

भारत-इस्रायल शस्त्रास्त्र कराराची चौकशी ( Plea in SC seeks probe in Pegasus ) करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात वकील एमएल शर्मा यांनी दाखल केली आहे. अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पेगाससंदर्भातील ( Pegasus Spyware ) न्यूयॉर्क टाईम्सच्या ( New York Times Report on Pegasus ) अहवालामुळे भारतातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.

Pegasus snooping row
पेगासस
author img

By

Published : Jan 30, 2022, 4:18 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानंतर पेगासस हे स्पायवेअर पुन्हा चर्चेत आले आहे. 2017 साली भारत-इस्रायलदरम्यान झालेल्या शस्त्रास्त्र करारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर आज वकील एमएल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका ( Plea in SC seeks probe in Pegasus ) दाखल केली असून भारत-इस्रायल शस्त्रास्त्र कराराची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

भारत-इस्त्रायल कराराला संसदेने मान्यता दिली नव्हती. त्यामुळे हा करार रद्द करणे गरजेचे असून यासाठी खर्च करण्यात आलेल्या पैसेदेखील वसूल करणे आवश्यक आहे, असे एमएल शर्मा यांनी याचिकेत म्हटलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालामुळे भारतातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तावर सरकारची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न वृत्तसंस्था पीटीआयकडून करण्यात आला होता. परंतु अद्याप त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काय म्हटलं न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात?

पेगासस हे स्पायवेअर ( Pegasus Spyware ) भारताने 2017 मध्ये इस्रायलकडून संरक्षण करारात खरेदी केल्याचा धक्कादायक गोप्यस्फोट अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या ( New York Times Report on Pegasus ) रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये सुमारे २ अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र करार झाला होता. या करारात पेगसेस स्पायवेअर हे केंद्रस्थानी होते, असा दावा वृत्तात करण्यात आला आहे.

यापूर्वी पेगासस नावाच्या स्पायवेअरच्या माध्यमातून लोकांच्या व्हॉटसअॅपवर पाळत ठेवल्याची माहिती उघड झाली होती. व्हॉट्सअॅपनं यासंदर्भात एनएसओ (NSO Group ) या कंपनीला कोर्टात खेचल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधलं गेलं होतं. या स्पायवेअरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपची यंत्रणा भेदून पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे व्हॉट्सअपनं जाहीर केले. NSO या कंपनीनं मात्र त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर जुलै 2021 मध्ये, आंतरराष्ट्रीय मीडिया संस्था (international media organization) ने खुलासा केला होता, की इस्रायल स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून भारताचे दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते व एक न्यायाधीशासह 300 लोकांची हेरगिरी केले गेली आहे. यानंतर हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशानात गाजला होता. यावर विरोधकांनी गदारोळ घातल्यानंतर गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेगासस आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आरव्ही रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन केली होती.

काय आहे पेगासस स्पायवेअर ?

पेगासस स्पायवेअर निर्माण करणारी कंपनी एनएसओ ( NSO Group ) इस्रायलमधील आहे. पेगासस एक पावरफुल स्पायवेअर आहे. जे मोबाइल आणि कॉम्प्युटरमधून गोपनीय व वैयक्तिक माहिती चोरून हॅकर्सला पुरवते. हे स्पायवेअर तुमच्या फोनच्या माध्यमातून तुमची हेरगिरी करते. याच्या माध्यमातून आयओएस किंवा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असणारे फोन हॅक केले जाऊ शकतात. त्यानंतर फोनचा डेटा, ई-मेल, कॅमेरा, कॉल रेकॉर्ड आणि फोटोसह प्रत्येक अॅक्टिव्हीटीला ट्रेस केले जाते.

हेही वाचा - Pegasus Snooping : काय आहे पेगासस स्पाइवेअर.. काँग्रेसकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तर भाजपकडून सारवासारव

हेही वाचा - Phone tapping: पेगासस स्पायवेअरद्वारे नेते, मंत्री आणि पत्रकारांचे फोन टॅप, वाचा संपूर्ण प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.