नवी दिल्ली - कालपासून देशात कोरोना लसीचे ड्राय रन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासंबंधात तारखा जाहिर केल्या जाऊ शकतात.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) विशेष समितीने भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सीन'च्या आपात्कालीन उपयोगाला मंजूरी दिलेली आहे. या अगोदर शुक्रवारी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या 'कोविशिल्ड' या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती.
मात्र, याला अद्याप 'ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'कडून मंजूरी मिळालेली नाही. देशभरात 125 जिल्ह्यांमधील 286 ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. यासाठी 96 हजार लोकांना प्रशिक्षण दिले गेले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.