नालंदा Theft Nalanda Hospital : बिहारमधील नालंदा सदर रुग्णालयातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. 25 सप्टेंबर रोजी नालंदा येथे एक भीषण रस्ता अपघात झाला होता. ज्यात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची प्रकृती चिंताजनक होती. जखमींवर बिहार शरीफ सदर रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमींचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर नागगरिक संतप्त झाले आहेत.
मृतदेहावरचे दागिने चोरले : नालंदा सदर रुग्णालयात एक व्यक्ती गेली पाच वर्षे मोफत जेवण, उपचार घेऊन आपलं जीवन जगत होता. मात्र यादरम्यान या व्यक्तीला मृतदेहावरचे दागिने चोरताना रंगेहात पकडण्यात आलं. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णालयाच्या उपअधीक्षकांनी सांगितलं की, त्या व्यक्तीनं त्याच्याकडं राहण्याची, जेवणाची व्यवस्था नसल्याचं सांगितलं. याशिवाय त्याला गंभीर आजार असल्यानं त्याच्या मुलानं, सुनेनं त्याला तिला घरातून हाकलून दिलं होतं. दया दाखवून रुग्णालय व्यवस्थापनानं त्याला येथे राहण्याची परवानगी दिली. मात्र सोमवारी या रुग्णानं व्यावसायिक चोराप्रमाणे चोरी करण्यासाठी आपत्कालीन वॉर्ड गाठला. त्यानं तिथं मृत तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली.
"ही व्यक्ती तीन-चार वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये राहत आहे. सोडायला सांगितल्यावरही तो जात नसे. दोन-तीन तास हॉस्पिटलमधून बाहेर पडला, तरी तो परत येऊन सांगायचा की त्याला दम लागत आहे. अशाच गोष्टी सांगून तो रुग्णालयात राहायचा. जेवणाची, निवार्याची व्यवस्था नाही असे, तो म्हणायचा. तो आज मृतदेहातील दागिने चोरताना पकडला गेलाय. त्याला रुग्णालयानं बाहेर काढलं आहे. ही पहिलीच वेळ आहे. - डॉ. अशोक कुमार, उपअधीक्षक सदर रुग्णालय, नालंदा
चोरी करताना रंगेहात पकडले : ही व्यक्ती चोरी करत असताना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला रंगेहात पकडलं. नंतर ते कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आलं. चोरीच्या आरोपात पकडलेल्या या रुग्णाचं नाव प्रेमचंद प्रसाद असं असून तो मुख्यालय बिहार शरीफ येथील वॉर्ड क्रमांक 33 खंडक मोहल्लाचा रहिवासी आहे. तो सदर रुग्णालयात तीन-चार वर्षांहून अधिक काळ रुग्ण म्हणून दाखल होता.
रुग्णाचं म्हणणं काय ? : इतकी वर्षे रुग्णालयात राहण्याचं कारण विचारले असता रुग्ण प्रेमचंदनं सांगितलं की, त्यांच्या घरी राहण्यासाठी जागा नाही. गंभीर आजारामुळं मी सदर रुग्णालयात राहत होतो. मुलानं सुनेनं घरी राहू दिले नाही. दर आठवड्याला प्रेमचंद यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला येत असत.
“घरात राहण्यासाठी जागा नव्हती. मी गंभीर आजारी होतो, त्यामुळं माझा मुलगा आणि सून मला घरी राहू देत नव्हते. तो दर आठवड्याला मला भेटायला यायचे. मी गंभीर आजारी असल्यानं सदर हॉस्पिटलमध्ये राहायचो.'' - प्रेमचंद, आरोपी.
इमर्जन्सी वॉर्डमध्ये एक बेड आरक्षित? आरोपीला रुग्णालयातून हाकलून देण्यात आलं आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून एका व्यक्तीला रुग्णालयात कसं राहू दिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था सदर हॉस्पिटलमध्येच होती. आपत्कालीन वॉर्डात खाटांची कमतरता असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांपासून रुग्णानं एक बेड आरक्षित केल्यानं अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रेमचंद यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
इशारा देऊन सोडण्यात आलं : माहितीनुसार, रुग्ण प्रेमचंद यांना पावपुरीला रेफर केले गेलं होतं. तेव्हा ते परत येऊन सदर हॉस्पिटलमध्ये राहायचा. तसेच यापुढे प्रेमचंदला सदर रुग्णालयात येऊ देऊ नये, अशा कडक सूचना कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यावर बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. रुग्णाला इशारा देऊन सोडण्यात आले आहे.
हेही वाचा -
- Minor Girl Raped : उज्जैनमध्ये निर्भयासारखं बलात्काराचं प्रकरण, अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा
- Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा
- Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा