ETV Bharat / bharat

संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023; लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, तीन जण घुसले तर दोघांनी गॅलरीतून मारली उडी - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. आज सकाळीच काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी कतारमध्ये अडकलेल्या नौदलांच्या जवानांना परत आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या, यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे.

Parliament Winter Session 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 1:01 PM IST

Updated : Dec 13, 2023, 2:18 PM IST

नवी दिल्ली Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 8 वा दिवस आहे. मंगळवारी संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरुन बराच गदारोळ झाला होता. त्यामुळे विरोधकांनी राज्यसभेत मोठा गोंधळ घालत सदनातून बाहेर पडून निषेध व्यक्त केला होता. आजही संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक मोठा गोंधळ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अर्जुन मेघवाल हे विरोधकांना उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सदनात चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आज लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पुढं आलं आहे. लोकसभेत आज तीन जण घुसले असून त्यातील दोघांनी गॅलरीत उडी घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला.

  • #WATCH | Security breach at Lok Sabha | Samajwadi Party (SP) MP Dimple Yadav says, "All those who come here - be it visitors or reporters - they don't carry tags. So, I think the government should pay attention to this. I think this is complete security lapse. Anything could have… pic.twitter.com/u5Q8ORxT3w

    — ANI (@ANI) December 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन तरुणांनी भेदली लोकसभेची सुरक्षा : लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज मोठी सुरक्षेतील चूक उघड झाली आहे. अधिवेशन सुरू असताना तीन तरुण लोकसभेत घुसले होते. यावेळी दोन तरुणांना गॅलरीतून लोकसभेत उडी मारली. त्यांनी आपल्या हातात काहीतरी संशयास्पद वस्तू दाखवून त्यातून वायू सोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा खासदार करत आहेत. या तरुणांनी संसदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पकडण्यात यश आलं. विशेष म्हणजे आज संसदेवरील हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याच दिवशी आज तीन तरुणांनी लोकसभेची सुरक्षा भेदून गॅलरीतून उड्या मारल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

  • #WATCH | Security breach in Lok Sabha | Congress MP Karti Chidambaram says "Suddenly two young men around 20 years old jumped into the House from the visitor's gallery and had canisters in their hand. These canisters were emitting yellow smoke. One of them was attempting to run… pic.twitter.com/RhZlecrzxo

  • Winter Session of Parliament | Congress MP Manish Tewari gives Adjournment motion notice in Lok Sabha to discuss the situation of Navy personnel in Qatar and the steps taken to bring them back to India. pic.twitter.com/T2Tbvoxtz3

रेल्वे तिकीटावरुन अधिर रंजन चौधरी आक्रमक : रेल्वे तिकीटाच्या भाडेवाढीचा मुद्दा आज सकाळीच संसदेत ऐरणीवर आला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी लोकसभेत मांडला. रेल्वे तिकीट दरावरुन खासदार अधीर रंजन चौधरी हे चांगलेच आक्रमक झाले. मात्र या विषयावर सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देतो, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.

नौदलाच्या जवानांना कधी परत आणणार : कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ जवानांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र या जवानांना परत आणण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या जवानांना कधी परत आणण्यात येणार आहे, असा सवाल काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी केला. कतारमधून भारतीय नौदलाच्या जवानांना परत आणण्यासाठी चर्चा करण्यात यावी, यासाठी खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे नौदलाच्या जवानांना परत आणण्याचा मुद्दाही आज चांगलाच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याची रणनीती आखली आहे.

  • #WATCH | On Chief Election Commissioner and other Election Commissioners (Appointment, Conditions of Service and Term of Office) Bill 2023 passed in the Rajya Sabha, Leader of Congress in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury says, "The meaning is clear, you don't need rocket science… pic.twitter.com/HhDMkvTxTL

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा', जाणून घ्या संपूर्ण तपशील
  2. Parliament Winter Session : 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन
  3. Parliament Special Session : सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, पत्रातून केली 'मोठी' मागणी

Last Updated : Dec 13, 2023, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.