नवी दिल्ली Parliament Special Session : सोमवार, १९ सप्टेंबरला संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अधिवेशनाला नव्या संसद भवनातून सुरुवात होणार आहे. पाच दिवस चालणारे हे विशेष अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू झालं होतं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेला संबोधित केलं. आता दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कामकाजाचं संपूर्ण वेळापत्रक समोर आलं आहे. जाणून घेऊया
सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात : आज सकाळी साडेनऊ वाजता जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांचं फोटो सेशन झालं. त्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासून विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल. या दरम्यान संसदेच्या ऐतिहासिक वारशावर चर्चा करण्यात येणार आहे. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात येईल.
-
Special Session of the Parliament | Security personnel at the Parliament building in the new uniform. pic.twitter.com/91MOXbtAyZ
— ANI (@ANI) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Special Session of the Parliament | Security personnel at the Parliament building in the new uniform. pic.twitter.com/91MOXbtAyZ
— ANI (@ANI) September 19, 2023Special Session of the Parliament | Security personnel at the Parliament building in the new uniform. pic.twitter.com/91MOXbtAyZ
— ANI (@ANI) September 19, 2023
या खासदारांना बोलण्याची संधी : सेंट्रल हॉलमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, पीयूष गोयल, मेनका गांधी हे नेते बोलणार आहेत. नेत्यांच्या भाषणाचा कार्यक्रम सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. तो दुपारी १२.३० वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लोकसभेचं कामकाज सुरू होईल.
मोदी संविधानाची प्रत घेऊन नवीन संसद भवनात जाणार : पंतप्रधान मोदी संविधानाची प्रत घेऊन नवीन संसद भवनात जाणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर महिला आरक्षण विधेयकही संसदेत मांडलं जाऊ शकतं. सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या विशेष सत्राची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या भाषणानं झाली. त्यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टींचा उल्लेख केला. 'जुन्या संसद भवनाला निरोप देण्याचा क्षण भावनिक आहे. संसदेची जुनी इमारत सर्वांना प्रेरणा देत राहील', असं ते म्हणाले. संसदेची जुनी इमारत परदेशी राज्यकर्त्यांनी बांधली असली तरी आपल्या देशवासीयांनी तिच्यासाठी रक्त आणि घाम ओतला असल्याचं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :