नवी दिल्ली - विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपत्ती एम. व्यकंय्या नायडू यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार झा म्हणाले, की संसदेमध्ये देशाची प्रतिष्ठा आहे. जर संसदेमध्ये अशीच स्थिती राहिली तर प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महिला खासदारांशी गैरवर्तवणूक ही अत्यंत दुर्दैवी घटना होती.
राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा म्हणाले, की संसदेमध्ये कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार नव्हते. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. पीगसस वाद, नवीन कृषी कायदे, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारकडून सभागृहामध्ये चर्चा झाली नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन हे 13 ऑगस्टपर्यंत सुरू होणे अपेक्षित असताना काल (बुधवारी) स्थगित करण्यात आले. कोणत्याही चर्चेविना विधेयके संसदेमध्ये मंजूर करण्यात आली आहेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांना त्यांच्या सूचना द्यायच्या असताना तसे घडले नसल्याचे खासदार झा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री हे संसदेपासून का पळाले - डेरेक ओ ब्रायन
महिला खासदारांबरोबरील गैरवर्तणुकीचा केंद्राने फेटाळला आरोप-
संसदेत काल (11 ऑगस्ट 2021) विरोधी पक्षांच्या खासदारांनी मार्शलला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मार्शलने राज्यसभेच्या महिला खासदारांशी गैरवर्तवणूक केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप केंद्र सरकारने गुरुवारी फेटाळला आहे. राज्यसभेत बुधवारी अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून विरोधी पक्षांचे सदस्य हे टेबलवर चढण्यांच्या घटनांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल. तरीही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनावजवळ येऊन जोरदार घोषणा आणि कागद फेकून दिले. तर काही सदस्यांनी आसनाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये वाद झाला.
हेही वाचा-मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप
राज्यसभेत बुधवारी काय घडले?
राज्यसभेत बुधवारी 127 व्या घटना दुरुस्ती विधेयकावर 6 तास चर्चा करून मंजूर करण्यात आली. त्यानंतर विमा दुरुस्ती विधेयक हे मंजू करण्यासाठी मांडण्यात आले. यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. या विधेयकात सरकारी विमा कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या तरतुदीचा समावेश आहे. या तरतुदीमुळे विमा कंपन्या विकल्या जाणार असल्याची टीका करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आसनावजवळ जाऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांना सुमारे 50 सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरून त्यांना आसनाजवळ जाण्यास रोखले. महिला सदस्यांसमोर पुरुष सुरक्षा कर्मचारी आणि पुरुष सदस्यांसमोर महिला सुरक्षा कर्मचारी अशी सुरक्षा व्यवस्था होती. तरीही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आदी विरोधी पक्षांनी सुरक्षा व्यवस्थेला जुमानले नाही. त्यांनी कडाडून विरोध करत कागद फाडले. अधिकाऱ्यांचे टेबल आणि आसनाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही सदस्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा घेराव तोडण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-दुहेरी दणका! राहुल गांधींच्या अकाउंटवर कारवाई केल्यानंतर काँग्रेसचे अधिकृत ट्विटर बंद