ETV Bharat / bharat

Monsoon Session 2023 : 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत - काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. अधिवेशनापूर्वी काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक होणार आहे. काँग्रेस सीसीए आणि इतर मुद्यावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.

Parliamentary Monsoon Session 2023
संसदेचे पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jul 1, 2023, 7:47 PM IST

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी पावसाळी अधिवेशन 2023 ची घोषणा केली. पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जोशी यांनी ट्विट केले की, 'संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल आणि 11 ऑगस्टपर्यंत चालेल. पावसाळी अधिवेशनात विधिमंडळ कामकाज आणि इतर विषयांवर अर्थपूर्ण चर्चेसाठी मी सर्व पक्षांना हातभार लावण्याची विनंती करतो'. 23 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 17 बैठका होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

  • "Monsoon Session, 2023 of Parliament will commence from 20th July and continue till 11th August. Urge all parties to contribute towards productive discussions on Legislative Business and other items during the Monsoon Session," tweets Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi pic.twitter.com/1o5rq0odug

    — ANI (@ANI) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरोधकांची भाजपला घेरण्याची रणनीती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यानंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसची प्रमुख मागणी अदानी प्रकरणाबाबत असेल. याप्रकरणी जेपीसीसी चौकशीची मागणी करत भाजप सरकारला घेरण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसने 19 समविचारी पक्षांचे नेतृत्व केले होते. या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यात त्यांना यश आले होते. यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता, मात्र नंतर त्यांचे भाषण लोकसभेच्या रेकॉर्डमधून हटवण्यात आले होते.

काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक : 3 जुलै रोजी समान नागरी संहितेवर संसदीय स्थायी समितीच्या चर्चेपूर्वी काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया गांधी संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. बैठकीत, सोनिया गांधी प्रस्तावित यूसीसी आणि मणिपूर हिंसाचार, चिनी घुसखोरी, किंमतवाढ आणि अदानीवरील जेपीसी यासारख्या इतर प्रमुख मुद्द्यांवर पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करतील. सोबतच या मुद्द्यांवर विरोधी एकजूट कशी निर्माण करता येईल यावरही चर्चा होणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी एकता निर्माण करणे काँग्रेससाठी महत्त्वाचे आहे. अलीकडेच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीशी संबंधित वादग्रस्त अध्यादेशावरून पाठिंबा न दिल्याने आप काँग्रेसवर नाराज आहे.

हेही वाचा :

  1. Bjp Game Plan 2024 : कर्नाटक पराभवातून भाजपने घेतला धडा, आगामी निवडणुकांसाठी आखली योजना
  2. Uniform Civil Code News : मोदी सरकार पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत, बोलावली महत्त्वाची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.