ETV Bharat / bharat

Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर प्रकरणावरून विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ, राज्यसभा 2 वाजेपर्यंत तहकूब - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची रणनीती

मणिपूर महिलांच्या विवस्त्र व्हिडिओमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही मणिपूर हिंसाचारामुळे चांगलाच गदारोळ सुरु आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून आजही काँग्रेस नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Parliament Monsoon Session 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 24, 2023, 9:31 AM IST

Updated : Jul 24, 2023, 12:50 PM IST

नवी दिल्ली : मणिपूर घटनेवरुन विरोधी पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू केला आहे. आज संसदेच्या तिसऱ्या दिवशीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे मणिपूर घटनेबाबत आजही दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन लोकसभेत जोरदार गदारोळ केल्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभा दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

  • #WATCH | Congress MP Shashi Tharoor on Opposition demanding the PM's statement on Manipur issue in Parliament, "The PM is accountable to the Parliament... There is no parliamentary democracy in the world in which the Parliament doesn't have the chance to meet, question & hear… pic.twitter.com/11yBF7eSAk

    — ANI (@ANI) July 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Live updates-

  • जगात अशी कोणतीही संसदीय लोकशाही नाही जिथे संसदेत पंतप्रधानांना भेटण्याची, प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. पंतप्रधानांनी घेतलेली ही विचित्र भूमिका असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केला.
  • मणिपूर मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. यावर राज्यसभेच्या अध्यक्षांनी आप खासदार संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहे.
    • #WATCH | Delhi: On BJP's protest against rising atrocities & crime against women in Rajasthan, BJP MP Ravi Kishan says, "We demand the resignation of Rajasthan CM Ashok Gehlot. The atrocities on Dalits (women) need to be stopped. The atrocities have tremendously increased and so… pic.twitter.com/bLrZPf6ADf

राजस्थानच्या भाजप खासदारांचे संसदेत आंदोलन : राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याचा आरोप राजस्थानच्या भाजप खासदारांनी केला आहे. भाजपच्या खासदारांनी राजस्थानमधील महिलांवरील अत्याचाराचा ठपका मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे भाजपने अशोक गहलोत यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. भाजप खासदार रवि किशन यांनी राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार वाढल्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजीनामा देण्याची मागणूी केली आहे. भाजप खासदारांनी संसदेतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे.

विरोधी पक्षांना अधिवेशन चालू द्यायचे नाही : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झाले असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारला दिल्ली सेवा अध्यादेशासह 31 विधेयके मंजूर करायची आहेत. मणिपूरमधील घटना अत्यंत गंभीर आहे. मात्र काही विरोधी पक्षांना मणिपूर घटनेवरुन संसदेचे कामकाज चालू द्यायचे नाही, असा आरोप शुक्रवारी लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या प्रकाराने संपूर्ण देशाची नाचक्की झाल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराबाबत भाजपनेही 'इंडिया'चा (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) सामना करण्याची रणनीती तयार केली आहे.

  • #WATCH | We request the Opposition to take part in structured and constructive discussions in the Parliament. Why are they running away from discussions? Nobody is able to understand their strategy: Union minister Pralhad Joshi on Manipur issue pic.twitter.com/CQrNoMZP3W

सरकार चर्चेसाठी तयार : सभापतींनी सूचना दिल्यानंतर आम्ही संसदेत मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे अमित शाह यांनी सभापती आणि अध्यक्षांना अधिकृतपणे सांगितले आहे. विरोधकांनी नवीन मागण्या आणून चर्चेत व्यत्यय आणणे चुकीचे आहे. महत्त्वाची विधेयके आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला संसदेत सर्वसमावेशक चर्चा करायची आहे. विरोधी पक्ष केवळ चुकीची माहिती देऊन संसदेचे कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • #WATCH | AAP MP Raghav Chada says "The country demands that the Govt and PM Modi should speak on the issue of Manipur. It is the responsibility of the Central govt to restore peace in the country. Today we are going to protest against this issue in the Parliament. Rajya Sabha… pic.twitter.com/bHGAVZMqOF

हेही वाचा -

  • #WATCH | Delhi: BJP Rajasthan MPs along with senior leaders hold a protest in front of the Gandhi statue. The protest is against issues of rising atrocities and crime against women in the state. pic.twitter.com/ruyKBbsZEM

  1. parliament monsoon session : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखडांनी आप खासदार राघव चढ्ढांना फटकारले
  2. Monsoon Session 2023 Updates : मणिपूर महिला अत्याचारावरुन विरोधकांचा संसदेत हल्लाबोल; विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा सोमवारपर्यंत तहकूब

Last Updated : Jul 24, 2023, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.