दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत आहेत. पंतप्रधान बोलण्यापूर्वीच काही विरोधकांनी पंतप्रधानांच्या भाषणातून सभात्याग केला. पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचताच भाजपच्या खासदारांनी त्यांचे जय श्री रामने स्वागत केले. काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानींचा उल्लेख करत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यावर मोदी यांनी आपल्या भषणाच्या सुरूवातीलाच घणाघात केला आहे. यावेळी मोदींनी विरोधकांवर टीका करताना ईडीचा उल्लेख केला. ईडीच्या भीतीने विरोधक एकत्र आले आहेत असे म्हणत त्यांनी जोरजार हमला केला आहे.
हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील घोटाळ्यांचे दशक : पंतप्रधान मोदी म्हणाले काँग्रेसने रोजगारासाठी काहीही केले नाही. काही लोक अशा निराशेत बुडलेले असतात. 2004 ते 2014 या काळात भारताची अर्थव्यवस्था ढासळली होती. महागाई दोन अंकी राहिली. मात्र, आमच्या काळात काही चांगले झाले तर काही लोकांना निराशा जास्त येते असे म्हणत मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. बेरोजगारी दूर करण्याच्या नावाखाली कायदा कोणी दाखवला ? असा प्रश्न उपस्थित करत आता ये लोक दूर गेले आहेत असा टोलाही मोदी यांनी लगावला आहे.. 2004 ते 2014 हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील घोटाळ्यांचे दशक आहे असा थेट घणाघात मोदी यांनी यावेळी बोलताना केला आहे. यूपीएच्या याच 10 वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत राहिले असही ते म्हणाले आहेत.
मोदींवर असलेला विश्वास त्यांच्या आकलनापलीकडचा : काही लोक स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप काही उद्ध्वस्त करण्यात गुंतलेलो आहेत. काही लोक स्वतःसाठी, कुटुंबासाठी जगत असतात असे म्हणत गांधी कुटुंबावर टीका केली आहे. मोदी 140 कोटी कुटुंबासोबत राहत आहेत, 140 कोटींचे आशीर्वाद मोदींसोबत आहेत. खोट्याच्या शस्त्रांनी तुम्ही या श्रद्धेचे चिलखत कधीही काढू शकत नाहीत असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, मोदी म्हणाले, जे अहंकारी आहेत त्यांना वाटते की मोदींना शिव्या देऊनच आमचा मार्ग सापडेल. आता 22 वर्षे उलटली तरी ते हा गैरसमज घेऊन बसले आहेत. मात्र, जनतेचा मोदींवर विश्वास आहे. टिव्हीवरील चमकणाऱ्या चेहऱ्यांमुळे हा विश्वास नाही, देशवासीयांचा मोदींवर असलेला विश्वास त्यांच्या आकलनापलीकडचा आहे असही मोदी म्हणाले आहेत.
मोदी वृत्तपत्रांच्या मथळ्यांनी बनलेले नाहीत : मोदी हे वृत्तपत्रांच्या मथळ्यांनी बनलेले नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. खोटे आरोप करणाऱ्यांवर कोणी विश्वास ठेवणार नाही. कित्येक वर्ष या कामासाठी खर्च केलेत. एका एका क्षणाची किंमत मोजली तेव्हा हे मोदी आहेत. असे म्हणत टीव्हीवर दिसणाऱ्या चेहऱ्यामुळे आणि वृत्तपत्रांच्या मथळ्यामुळे हे मोदी नाहीत असे म्हण मोदींनी आपल्या संघर्षाचा पाढाच वाचला. यावेळी देशातील गरीबांच्या बाजून आपण उभे आहोत असे म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
2G, CWG घोटाळ्यांचा उल्लेख : आमचा काळ सुरू होण्याअगोदर 10 वर्षांत भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की कोणीही ऐकायला तयार नव्हते. प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर करणे ही यूपीए सरकारची ओळख बनली होती. जेव्हा तंत्रज्ञानाचे युग खूप वेगाने वाढत होते, त्याच वेळी ते 2G मध्ये अडकून राहिले. जेव्हा अणुकरारावर चर्चा झाली, तेव्हा ते तसेच पडून राहीले. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा CWG घोटाळ्याने संपूर्ण देश जगात बदनाम झाला असा थेट आरोप मोदी यांनी केला आहे.
कोरोना लसीकरणावरही भाष्य : पंतप्रधान मोदी म्हणाले, साथीच्या रोगाच्या काळात, आम्ही संकटकाळात 150 हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लस पोहोचवल्या. त्यामुळेच आज अनेक देश जागतिक व्यासपीठांवर भारताचे खुलेपणाने आभार मानतात, भारताचे गुणगान गातात. त्याचवेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे ते सरकार आहे, जे पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. जो देशासाठी निर्णय घेऊ शकते. सुधारणा खात्रीने होत आहेत. आणि आम्ही या मार्गापासून दूर जाणार नाहीत. देशाला जे काही हवे आहे ते ते कोणत्याही वेळी देत राहतील असही ते म्हणाले आहेत.
पीएम मोदींचा इशारा पाकिस्तानकडे : पंतप्रधान मोदी लोकसभेत म्हणाले की आव्हानांशिवाय जीवन नाही. अनेक देशांमध्ये प्रचंड महागाई आहे. खाण्यापिण्याचे संकट आहे. तीच परिस्थिती आपल्या परिसरातही आहे. अशा परिस्थितीत कोणत्या भारतीयाला अभिमान वाटणार नाही की अशा काळातही देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. आज जगाचा भारतावर विश्वास आहे. आज भारताला जगातील श्रीमंत देशांच्या G20 गटाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. पण मला असे वाटते की काही लोकांना यामुळे वाईट वाटत आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा : राष्ट्रपतींच्या भाषणात बेरोजगारी, महागाई नाही.. पण लोकं याचीच चर्चा करतात: राहुल गांधी