मेहसाणा ( गुजरात ) : मेहसाणा येथील नुगर गावात 84 कडवा पाटीदार समाजातर्फे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाजाचे नेते जशू पटेल यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार समाजात लव्ह मॅरेज आणि लव्ह जिहादचा प्रसार रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्याबाबत सरकारकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात ( Resolution passed by Patidar Samaj ) आला. तसेच प्रेमविवाहासाठी पालकांची संमती अनिवार्य करण्यावर भर देण्यात ( Parental Approval Mandatory For Love Marriage ) आला.
जिल्ह्यात पाटीदार समाजाचे प्राबल्य आहे. नुकतेच नुगर गावात झालेल्या 84 कडवा पाटीदार समाज संमेलनात विविध समाजातील लव्ह मॅरेज आणि लव्ह जिहादबाबत कायद्यात बदल करण्याचा ठराव आणण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
प्रेमविवाह पालकांच्या परवानगीनेच होऊ शकतो : कोणत्याही समाजातील मुलगी किंवा मुलगा जेव्हा प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा ते केवळ तिच्या पालकांच्या परवानगीनेच करू शकतील, असे सुचवण्यात आले आहे. संमतीशिवाय लग्न करणार्यांकडून आपोआपच त्यांच्या पालकांची मालमत्ता किंवा वारसा काढून घेतला पाहिजे. त्यात म्हटले आहे की, सध्या अनेक तरुण-तरुणी इतर धर्माच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करतात पण नंतर त्यांना पश्चाताप होतो.
हेही वाचा : Sairat Incidence in Miraj : मिरजेत सैराटचा थरार; प्रेमविवाह केलेल्या तरुणावर हल्ला