नवी दिल्ली - ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर एलोन मस्क लवकरच कंपनीच्या व्यवस्थापनात मोठे बदल करू शकतात, अशी चर्चा आहे. ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल यांना ( Twitter CEO Parag Agrawal ) पदावरून हटविले जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी त्यांची पत्नी विनिता अग्रवाल ( Parag Agrawal wife Vineeta agrawal ) यांनी कंपनीत प्रवेश केला आहे.
विनिता अग्रवाल यांचा ट्विटरमध्ये प्रवेश थेट नाही. खरे तर, विनिता ज्या अमेरिकेतील कंपनी काम करत आहेत, त्या कंपनीने एलोन मस्कला 7.1 अब्ज डॉलरकरिता मदत देऊन ट्विटरवरील करारात सहभाग घेतला आहे. एलॉन मस्कने ४४ अब्ज डॉलर्सच्या डीलनंतर ट्विटरचे अधिग्रहण केले आहे.
एलॉन मस्कने ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर, अनेक कंपन्या आणि गुंतवणूकदारांनी या करारासाठी निधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी एक कंपनी यूएस व्हेंचर कॅपिटल फर्म ( Andreessen Horowitz ) आहे. या कंपनीने एलोन मस्कसोबत $7.1 अब्ज डॉलरची गुंतवणूक ( Parag Agrawal wife linked with musk ) केली आहे. व्हेंचर कॅपिटल कंपनी अँड्रीसेन होरोविट्झची जनरल पार्टनर विनिता अग्रवाल या ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांच्या पत्नी आहेत. विनिता कंपनीच्या बायो अँड हेल्थ फंड, लाइफ सायन्स टूल्स, डिजिटल हेल्थ, तसेच ड्रग डेव्हलपमेंट आणि पेशंट केअर डिलिव्हरीचे कामकाज सांभाळतात.
उद्यम गुंतवणूकदार म्हणून काम- यूएस व्हेंचर कॅपिटलमध्ये सामील होण्यापूर्वी विनिता अग्रवाल ( Vineeta agrawal )यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात खूप काही केले होते. त्यांनी हेल्थटेक स्टार्टअप्स गुगल व्हेंचर्स लाईफ सायन्सेस ( Google Ventures Life Sciences ) टीममध्ये उद्यम गुंतवणूकदार म्हणून काम केले आहे. याआधी त्यांनी कायरस ( Kyrus ) येथे डेटा सायंटिस्ट म्हणून आणि मायकिन्से ( McKinsey ) कंपनीमध्ये बायोटेक, फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय उपकरण ग्राहकांसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम केले. त्या फ्लॅटिरॉन हेल्थ येथे उत्पादन व्यवस्थापनातही संचालक होत्या.
विनिता यांचे शिक्षण- विनिता यांचे शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बायोफिजिक्समध्ये विज्ञान पदवी आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून एमडी आणि पीएचडीदेखील केली आहे. विनिता या स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये फिजिशियन आणि सहाय्यक क्लिनिकल प्रोफेसर आहेत. विनिता यांनी बिगहॅट बायोसायन्सेस, जीसी थेरप्युटिक्स, मेमोरा हेल्थ, थाइम केअर, पर्ल हेल्थ आणि वेमार्क यासह अनेक पोर्टफोलिओ कंपनी बोर्डांवर काम काम केले आहे.
असे आहे पराग व विनिता यांचे कुटुंब- पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बीटेकचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. पराग आणि विनिता यांना अंश नावाचा मुलगा आहे. हे जोडपे सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे राहते. दरम्यान, पराग यांच्याकडे ट्विटरमधील काय जबाबदारी असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे स्वतः सोशल प्लॅटफॉर्मचे तात्पुरते सीईओ बनतील, असा अंदाज आहे. असे असले तरी करारातील एका कलमामुळे ट्विटर सोडल्यानंतर पराग यांना सुमारे 39 दशलक्ष डॉलर मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Car Driver Suicide in River : चालकाने कारसह भाक्रा कालव्यात घेतली जलसमाधी