नवी दिल्ली : भारतीय समूह शापूरजी पालोनजी समुहाचे अध्यक्ष पल्लोनजी मिस्त्री यांचे सोमवारी रात्री वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईत निधन ( Pallonji Mistry passes away ) झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या उद्योगपतीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. "श्री पल्लोनजी मिस्त्री यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांनी वाणिज्य आणि उद्योग जगतात अतुलनीय योगदान दिले. त्यांचे कुटुंब, मित्र आणि असंख्य हितचिंतकांना माझ्या संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो," असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.
थोडक्यात माहिती : 1929 मध्ये जन्मलेल्या मिस्त्री यांना उद्योगपती म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई-मुख्यालय असलेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपची स्थापना 1865 मध्ये झाली. बांधकाम, रिअल इस्टेट, कापड, इंजिनियरिंग वस्तूंचे व्यवहार, गृहोपयोगी उपकरणे, शिपिंग, प्रकाशने, उर्जा आणि जैवतंत्रज्ञान. मिस्त्री हे टाटा समूहातील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक होते. ज्यात एकूण 18 टक्क्यांहून अधिक शेअर्स होते. त्यांचे वडील शापूरजी पालोनजी यांनी 1930 मध्ये टाटा सन्सचे शेअर्स विकत घेतले होते.
-
Saddened by the passing away of Shri Pallonji Mistry. He made monumental contributions to the world of commerce and industry. My condolences to his family, friends and countless well-wishers. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Saddened by the passing away of Shri Pallonji Mistry. He made monumental contributions to the world of commerce and industry. My condolences to his family, friends and countless well-wishers. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2022Saddened by the passing away of Shri Pallonji Mistry. He made monumental contributions to the world of commerce and industry. My condolences to his family, friends and countless well-wishers. May his soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2022
उद्योगपतीच्या निधनानंतर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट केले आहे. "शापूरजी पालोनजी ग्रुप चेअरमन श्री पल्लोनजी मिस्त्री जी हे त्यांच्या उद्योगाचे प्रणेते होते आणि त्यांनी अनेक दशके हाती घेतलेल्या प्रकल्पांबद्दल उत्साही होते. त्यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. मी त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो," असे ठाकूर म्हणाले.
हेही वाचा : बांधकाम सुरू असलेल्या चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये आग; कामगारांची चाळ जळून खाक