ETV Bharat / bharat

Jammu and Kashmir: आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी घुसखोर ठार, आणखी एकाला अटक - International Border In Jammu And Kashmir

जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेल्या वेगळ्या घटनांमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराला ठार ( Pakistani Intruder Shot Dead ) करण्यात आले, तर दुसऱ्याला अटक करण्यात आली. ( International Border In Jammu And Kashmir )

Jammu and Kashmir
जम्मू-कश्मीर
author img

By

Published : Nov 22, 2022, 10:05 AM IST

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) बाजूने घुसखोरीचा प्रयत्न केला सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला आहे. घुसखोरीच्या प्रयत्नात मंगळवारी बीएसएफने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले ( Pakistani Intruder Shot Dead ) आणि दुसर्‍याला अटक केली. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. ( International Border In Jammu And Kashmir )

घुसखोरावर केला गोळीबार : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) प्रवक्त्याने सांगितले की, सतर्क जवानांनी पहाटे जम्मूच्या अरनिया सेक्टर आणि सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नांना हाणून पाडले. अर्निया सेक्टरमध्ये सीमा कुंपणाकडे आक्रमकपणे येताना दिसल्यावर बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोरावर गोळीबार केला. त्यांना थांबण्याचे आव्हान देण्यात आले होते पण त्यांनी लक्ष दिले नाही. दुसरा कोणताही पर्याय न सापडल्याने सैनिकांनी गोळीबार केला ज्यात तो मारला गेला.

पाकिस्तानी घुसखोराला पकडले : दुसर्‍या घटनेत रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यानंतर कुंपणाजवळ आल्यावर सैन्याने पाकिस्तानी घुसखोराला पकडले. गेट उघडल्यानंतर त्याला कुंपणाच्या भारतीय बाजूने आत आणण्यात आले. आतापर्यंत त्याच्या ताब्यातून काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही. दोन्ही सेक्टरच्या संपूर्ण परिसराची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.