नवी दिल्ली देशातील 10 सर्वात श्रीमंत अब्जाधीशांवर पाच टक्के (1.37 लाख कोटी रुपये) एकरकमी कर लादल्यास मिळणारी रक्कम चक्रावून टाकणारी आहे. ही रक्कम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बजेटच्या (86,200 कोटी रुपये) 1.5 पट आहे. ) महिला कामगारांना पुरुषांच्या तुलनेत प्रत्येक रुपयासाठी फक्त 63 पैसे मिळतात. तसेच अनुसूचित जाती आणि ग्रामीण भागातील कामगारांना मिळणाऱ्या मानधनानही तफावत असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. अनुसूचित जातींना 55 टक्के आणि ग्रामीण मजुरांना 50 टक्के मजुरी कमीच मिळते, ही गंभीर बाब अहवालात नमूद केली आहे.
गरीब लोक अधिक कर भरतात देशातील 100 अब्जाधीशांवर 2.5 टक्के कर किंवा आघाडीच्या 10 भारतीय अब्जाधीशांवर पाच टक्के कर लावण्यास शाळांपासून वंचित राहणाऱ्या मुलांना परत आणण्यासाठी निधी मिळू शकणार आहे. ऑक्सफॅम इंडियाचे सीईओ अमिताभ बेहर म्हणाले, 'देशातील वंचित दलित, आदिवासी, मुस्लिम, महिला आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्रास सहन करावा लागतो. गरीब लोक अधिक कर भरत आहेत. गरीब हे श्रीमंतांपेक्षा जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर अधिक खर्च करतात.
प्रचंड श्रीमंती आणि कमालीची गरिबी एकाचवेळी वाढली : श्रीमंतांवर कर लावण्याची आणि त्यांनी त्यांचा योग्य हिस्सा भरावा, यासाठी खात्री करण्याची वेळ आली आहे. बेहर यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना संपत्ती कर आणि वारसा कर यासारखे आधुनिक कर लागू करण्याची विनंती केली. ते म्हणाले की हे कर असमानतेचे संकट दूर करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. जगभरातील अब्जाधीशांची संपत्ती दिवसाला २.७ अब्ज डॉलरने वाढत आहे. तर किमान १.७ अब्ज कामगारांच्या महागाईचा दर हा वेतनातील वाढीपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्के लोकांनी गेल्या दशकभरात निम्मी संपत्ती मिळवली आहे. गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच प्रचंड श्रीमंती आणि कमालीची गरिबी एकाचवेळी वाढल्याचे दिसून आल्याचे ऑक्सफॅम अहवालात म्हटले आहे.
दोन वर्षांत जगातील 99 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट विश्व आर्थिक मंचच्या ऑनलाइन दावोस अजेंडा समिटच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या 'इनइक्वॅलिटी किल्स' या अहवालात ऑक्सफॅम इंटरनॅशनलने म्हटले आहे की, असमानतेमुळे दररोज किमान 21,000 किंवा त्याहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. चार सेकंदात एक व्यक्ती मरत आहे. आरोग्य सेवा, लिंग-आधारित हिंसाचार, भूक आणि हवामान यामुळे जागतिक मृत्यूंवर अहवालाचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अहवालानुसार, महामारीच्या पहिल्या दोन वर्षांत जगातील दहा श्रीमंत लोकांची संपत्ती प्रति सेकंद 15,000 डॉलरच्या दराने वाढली. या दहा लोकांची संपत्ती 99.999 टक्के गमावली तरी ते जगातील 99 टक्के लोकांपेक्षा श्रीमंत असतील. कोरोना साथीच्या पहिल्या दोन वर्षांत जगातील 99 टक्के लोकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. महामारीच्या काळात, जगातील दहा सर्वात श्रीमंत लोकांची संपत्ती प्रतिदिन 1.3 अरब डॉलर (रु. 9,000 कोटी) या दराने 1,500 अरब डॉलर (111 लाख कोटींहून अधिक) पर्यंत वाढली.