हैदराबाद Owaisis challenge to Rahul : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींविरोधात दंड थोपटले आहेत. राहुल गांधी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक केरळमधल्या वायनाडऐवजी हैदराबादमधून लढवण्याचं थेट आव्हान दिलंय. ओवेेसींनी रविवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी हे आव्हान दिलंय. ओवेसींनी या सभेत बाबरी मशिदीचा मुद्दाही उपस्थित केला.
बाबरी मशिदीवरून काँग्रेसवर हल्ला : काँग्रेसवर हल्ला करत ओवेसी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्येत काँग्रेसच्या राजवटीत बाबरी मशीद पाडण्यात आली होती. यावरून त्यांनी राहुल गांधींचं नाव घेत ओवेसी म्हणाले की, त्यांनी वायनाडऐवजी हैदराबादमधून निवडणूक लढवावी, असं खुलं आव्हान देत असल्याचं ओवेसी म्हणाले. तुम्ही मोठमोठी विधानं करता, हिंमत असेल तर मैदानात या आणि माझा सामना करा, असे म्हणत ओवेसींनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय.
-
#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief Asaduddin Owaisi says "I am challenging your leader (Rahul Gandhi) to contest elections from Hyderabad and not Wayanad. You keep giving big statements, come to the ground and fight against me. People from Congress will say a lot of… pic.twitter.com/TXANRLWtjJ
— ANI (@ANI) September 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief Asaduddin Owaisi says "I am challenging your leader (Rahul Gandhi) to contest elections from Hyderabad and not Wayanad. You keep giving big statements, come to the ground and fight against me. People from Congress will say a lot of… pic.twitter.com/TXANRLWtjJ
— ANI (@ANI) September 24, 2023#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief Asaduddin Owaisi says "I am challenging your leader (Rahul Gandhi) to contest elections from Hyderabad and not Wayanad. You keep giving big statements, come to the ground and fight against me. People from Congress will say a lot of… pic.twitter.com/TXANRLWtjJ
— ANI (@ANI) September 24, 2023
तिन्ही पक्ष एकत्र काम करतात : तेलंगणात काँग्रेस आणि एआयएमआयएम आमनेसामने असून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीवर पोहोचण्यासाठी दोन्ही पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, तेलंगणातील तुक्कुगुडा येथे एका सभेत बोलताना, तेलंगणात भारतीय जनता पार्टी, भारत राष्ट्र समिती आणि एआयएमआयएम एकजुटीने काम करत आहेत. कॉंग्रेस या तिघांच्या विरोधात लढत असल्याचं राहुल गांधी त्या सभेत म्हणाले होते. त्या सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, 'तेलंगणात काँग्रेस पक्ष बीआरएसविरोधात लढत नाही, तर बीआरएस, भाजपा आणि एआयएमआयएम एकत्र आहेत. सर्व पक्ष वेगवेगळे असले तरी एकदिलाने काम करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव किंवा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सीबीआय-ईडीचे कोणतेही खटले नाहीत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आपली माणसं मानतात, असा दावाही राहुल यांनी केला होता.
वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका : तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस येथे निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी पूर्ण होत आलीय. सत्ताधारी बीआरएस त्यांच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतंय. त्याचवेळी काँग्रेसनंही सहा हमीभाव जाहीर केले आहेत, काँग्रेस सत्तेत आल्यास हे पूर्ण केले जातील असं काँग्रेसनं म्हटलंय.
हेही वाचा :