कुरनूल (अमरावती) - आंध्र प्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात आयोजित केलेल्या बन्नी महोत्सवात मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू जाला आहे. हा महोत्सव अनेक दशकांपासून सुरू आहे. महोत्सावत काठ्यांनी लढाई करण्याची प्रथा आहे. या लढाईवर नियंत्रण आणण्याचे पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले आहे. तसेच कोरोनाच्या काळातील नियमांचेही उल्लंघन झाले आहे.
कुरनूल जिल्ह्यातील देवरगट्टू, होलागुंडा मंडलमध्ये बन्नी महोत्सावत भक्ती आणि श्रद्धेने काठ्यांनी लढाई करण्याची प्रथा आहे. या प्रथेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो. काठ्यांच्या लढाईत एका गटाकडून दुसऱ्या गटावर मोठ्या प्रमाणात लाठ्यांनी हल्ला करण्याच्या घटना आजवर घडत आलेल्या आहेत. तर अनेकदा भाविक गंभीर जखमी होतात. यंदाही असाच प्रकार घडला आहे.
हेही वाचा-राहुल गांधींना कशाची भीती वाटते? प्रशांत किशोर यांनी 'हे' दिले उत्तर
काय आहे बन्नी महोत्सव?
माला मल्लेश्वर स्वामी मंदिर अलूरजवळ देवरगट्टूजवळ उंच डोंगरावर आहे. प्रथेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी मंदिराची देवता, मलम्मा आणि मलेश्वर विवाह संपन्न होतो. त्यानंतर मशाली हातात घेऊन भाविक मूर्तींची मिरवणूक काढली. तीन गावातील लोकांनी एक गट बनविला. तर पाच गावातील लोकांनी मूर्तींच्या लढाईसाठी वेगळा गट बनविला. हा महोत्सव बन्नी सण म्हणून ओळखला जातो.
हेही वाचा-सिंघू सिमेवर तरुणाचा हात तोडला, पोलिसांच्या बॅरिकेड्सला अडकवला, निहंग शिखाला अटक
असे प्रयत्न झाले अयशस्वी-
काठ्यांनी लढाई करण्याची प्रथा रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, हे प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महोत्सवाच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीही 100 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या भाविकांना अदोने येथे नेण्यात आले आहे. वर्ष 2008 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) काठीने लढाई करण्याच्या प्रथेवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.