ETV Bharat / bharat

हिमाचलमध्ये दुर्घटना ; 40 जणांना घेऊन जाणाऱ्या बसवर कोसळली दरड!

भूस्खलनात अडकलेली बस ही हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (HRTC) होती. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस किन्नाअुरमधील रेकाँग पीओवरून शिमलाच्या दिशेने जात होती.

हिमाचल भूस्खलन दुर्घटना
हिमाचल भूस्खलन दुर्घटना
author img

By

Published : Aug 11, 2021, 3:09 PM IST

Updated : Aug 11, 2021, 4:32 PM IST

शिमला- हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. दरड कोसळण्याच्या घटनेत अनेक वाहने आणि 40 प्रवासी घेऊन जाणारी बस गाडली गेल्याचे किन्नौर जिल्ह्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यात आले आहेत. अद्याप घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेली बस ही हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची (HRTC) होती. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस किन्नौरमधील रेकाँग पीओवरून शिमलाच्या दिशेने जात होती. मदकार्यासाठी सैन्यदलाच्या राष्ट्रीय आपत्कालीन कृती दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक बचाव पथकाला बोलाविण्यात आल्याचे उपायुक्त अबीद हुसेन सादिक यांनी सांगितले. दगड कोसळत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा-IAS टॉपर टीना डाबी अन् पती IAS अतहर खान यांचा घटस्फोट मंजूर

सोलन जिल्ह्यातील दरड कोसळण्याच्या घटनेत मंगळवारी 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखणी झाले आहेत. नाहान-कुमारहट्टी एनएच एनएच 907 या ठिकाणी लाडूजवळही दरड कोसळण्याची घटना घडली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनापासून हिमाचल प्रदेशमध्ये 30 दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा-Monsoon Session Updates : 127वं संविधान संशोधन विधेयक आज राज्यसभेत मांडणार;अनिश्चित काळपर्यंत लोकसभा तहकूब

26 जुलैलाही किनौरमध्ये घडली होती भूस्खलनाची दुर्घटना

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सांगला चितकुल मार्गावर रविवारी दरड कोसळण्याची घटना घडली. यावेळी भूस्खलनामुळे पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सवर मोठी दरड कोसळली. या वाहनात राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीतील पर्यटकांचा समावेश होता.

हेही वाचा-'ती' व्हायरल जाहिरात खरंच बुर्ज खलिफावर चित्रित झाली का? एमिरेटसने दिले उत्तर

दरम्यान, महाराष्ट्रातही महाड येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 44हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

Last Updated : Aug 11, 2021, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.