नवी दिल्ली : बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये बृजभूषण सिंह यांच्यावरील पोक्सो कलम रद्द करण्याचा दावा करत पोलिसांनी पोक्सोचे आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे कुस्तीपटूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणातील महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने लवकरच पुढील रणनिती ठरवण्यात येणार असल्याचे जाहीर करुन आपण मागे हटणार नसल्याचेच ठणकावले आहे.
-
#WATCH | He has been named in the chargesheet submitted by police yesterday. In the minor's case, it is clear that there is a lot of pressure on the family. We will decide on the further course of action after our remaining demands are met by the govt," says wrestler Sakshee… pic.twitter.com/y3rjJluWeN
— ANI (@ANI) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | He has been named in the chargesheet submitted by police yesterday. In the minor's case, it is clear that there is a lot of pressure on the family. We will decide on the further course of action after our remaining demands are met by the govt," says wrestler Sakshee… pic.twitter.com/y3rjJluWeN
— ANI (@ANI) June 16, 2023#WATCH | He has been named in the chargesheet submitted by police yesterday. In the minor's case, it is clear that there is a lot of pressure on the family. We will decide on the further course of action after our remaining demands are met by the govt," says wrestler Sakshee… pic.twitter.com/y3rjJluWeN
— ANI (@ANI) June 16, 2023
पोक्सो कलम हटवण्याची शिफारस : दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये भारतीय कुस्ती परिषदेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील पोक्सो कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची शिफारस न्यायालयाला केली आहे. त्यामुळे कुस्तीपटूंमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारतीय कुस्तीपटू आक्रमक पवित्रा घेत आहेत.
काय आहे खेळाडूंचा आरोप : महिला कुस्तीपटू राहत असलेल्या हॉटेलमध्ये ब्रिजभूषण त्याच मजल्यावर त्यांची खोली जाणूनबुजून बुक करत असे. 2021 मध्ये बल्गेरियामध्ये झालेल्या चॅम्पियनशिपदरम्यान हॉटेलमध्ये ज्या मजल्यावर महिला कुस्तीपटू राहत होत्या त्याच मजल्यावर माझी खोली बुक केली होती. ब्रिजभूषण सिंह लुंगी घालून हॉटेलमध्ये फिरत असे आणि खेळाडूंशी जबरदस्तीने बोलत असल्याचा आरोप एका कुस्तीपटूंनी केला. ब्रिजभूषण सिंह महिला कुस्तीपटूंना कोणत्या ना कोणत्या कारणाने अयोग्यरित्या स्पर्श करायचे असेही या खेळाडूंने आपल्या आरोपात नमूद केले आहे. ब्रिजभूषण सिंहनी महिला खेळाडूचा श्वासोच्छवासाचा प्रकार समजून घेण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप एका महिला कुस्तीपटूने केला. त्यामुळे कुस्तीपटूंमध्ये खळबळ उडाली होती.
काय आहे चार्जशीटमध्ये पोलिसांची बाजू : दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एक हजार पानाची चार्जशीट न्यायालयात दाखल केली आहे. या चार्जशीमध्ये ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील पोक्सो कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा -