ETV Bharat / bharat

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून 14 विरोधी खासदारांचं निलंबन, 'हे' आहे कारण? - Suspension of 14 opposition MPs

Opposition MPs Suspended : संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 14 खासदारांचं हिवाळी अधिवेशनातून निलंबन करण्यात आलं आहे. यात लोकसभेतील 13 तर राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे.

Opposition MPs Suspended
Opposition MPs Suspended
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 7:33 PM IST

नवी दिल्ली Opposition MPs Suspended : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावरून गुरुवारी (14 डिसेंबर) लोकसभा तसंच राज्यसभेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवर निवेदन करावं, अशी विरोधकांची मागणी होती. त्यामुळं गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपावरून लोकसभा सभापतींनी काँग्रेस सदस्य टी एन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस यांचं हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलं आहे.

यांचं झालं निलंबन : त्यानंतरही गदारोळ सुरूच रहिल्यानं आणखी 9 सदस्यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलंय. यामध्ये बेनी बेहानन (काँग्रेस), मोहम्मद जावेद (काँग्रेस), पी आर नटराजन (सीपीआयएम), कनिमोझी (डीएमके), व्ही के श्रीकंदन (काँग्रेस), के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन (डीएमके), एस वेंकटेशन (सीपीआयएम), मणिकम टागोर (काँग्रेस) यांचा या निलंबनात समावेश आहे.

सुरक्षेतील गंभीर चूक : संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितलं की, काल (बुधवार, 13 डिसेंबर) घडलेली घटना दुर्दैवी आहे. ही लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील गंभीर चूक होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या मुद्द्यावर बोलताना लोकसभा सभापती यांनी म्हटलंय की, कोणत्याही सदस्याकडून या घटनेवर राजकारण अपेक्षित नाही, पक्षीय राजकारणाच्या पुढं जाऊन यावर काम करावं लागेल. सुरक्षेतील त्रुटींच्या घटना यापूर्वीही संसदेत घडल्या असून तत्कालीन लोकसभा सभापतींच्या सूचनेनुसार कामकाज झालं - ओम बिर्ला, लोकसभा सभापती

सरकारचं अपयश लपवण्यासाठी आज खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. - लालन सिंह, जेडीयू खासदार

डेरेक ओब्रायन निलंबित : यापूर्वी तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यांच्या निलंबनाबाबत विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेत गदारोळ केला. यानंतर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. यानंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

सुरक्षेबाबत विरोधकांची मागणी : आज सकाळी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भविष्यातील रणनीतीबाबत विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर (ट्विटर) लिहिलं की, काल संसदेत झालेला अत्यंत गंभीर प्रकार आहे. सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात सविस्तर निवेदन द्यावे. यावर सविस्तर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

भाजपा खासदार प्रताप सिम्हावर कारवाई करा : ते पुढे म्हणाले, “घुसखोरांना व्हिजिटर पास उपलब्ध करून देणाऱ्या भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मोदी सरकारनं आमच्या वाजवी मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यानं लोकसभा, राज्यसभेचं कामकाज आज सकाळी तहकूब करण्यात आलं.

हेही वाचा -

  1. सिक्कीममध्ये अडकलेल्या 1 हजार 217 पर्यटकांची सैन्याकडून सुटका
  2. कृष्णजन्मभूमिही मुक्तीच्या मार्गावर? ज्ञानवापीनंतर मथुरेतील शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाला मंजुरी
  3. 'हा' आहे संसदेतील घुसखोरीचा कथित 'मास्टरमाइंड', 'या' 5 आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.