शोपियान - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत.
दोन ते तीन अतिरेकी रहिवासी घरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहीमेदरम्यान एका अतिरेकीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांच्या विरोधात सावधपणे कारवाई केली जात आहे.
दो दहशतवादी ठार तर एकाला अटक -
शनिवारी जम्मू काश्मीरच्या सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला अटक केली होती. या दहशतवाद्याकडून तीन चीनी पिस्तूल, 2 मॅग्झीन आणि 15 जिवंत काडतूसे आणि एक सायलेन्सर जप्त केले होते. तसेच 11 मार्चला अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती झाल्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली होती. मात्र, त्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. आदिल अहमद भट आणि जाहिद अहमद राठेर असे मृत दहशतवाद्यांचे नाव आहे.
हेही वाचा - दीदींचा आज व्हिलचेअरवरून कोलकातामध्ये प्रचार, जाहीरनाम्याची घोषणा पुढे ढकलली