ETV Bharat / bharat

स्वता:चेच तोंड शिवल्याचं केलं नाटक; पत्नीविरोधात रचलेला कट उलटला - भोलाराम

झारखंडच्या उंटारीच्या भीतिहरवामध्ये अशीच एक घडली आहे. पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने स्वता:चेच तोंड शिवल्याचे नाटक केले आणि पत्नीवर आरोप केला. पतीने कट रचत स्वता:ला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर आले.

Palamu
झारखंड
author img

By

Published : Jul 15, 2021, 2:14 PM IST

पलामू - पती-पत्नीमधील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण वाढतच आहे. काही चित्र-विचित्र घटना समोर येत आहेत. झारखंडच्या उंटारीच्या भीतिहरवामध्ये अशीच एक घडली आहे. पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने स्वता:चेच तोंड शिवल्याचे नाटक केले आणि पत्नीवर आरोप केला. पतीने कट रचत स्वता:ला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सत्य बाहेर आले.

भोलाराम असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. खरे तर त्याने स्वता:चे तोंड शिवले नव्हते. तर दोरा असा बांधला होती की पाहिल्यानंतर ते शिवल्यासारखे दिसत होते. भोलाराम हा भीतिहरवा येथील रहिवासी असून त्याने दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला 6 अपत्ये आहेत. तर दुसऱ्य पत्नीपासून एक मुलगा आहे.

संपत्तीच्या कारणावरून भोलारामचे दुसऱ्या पत्नीसोबत वाद-विवाद सुरू होते. यासंदर्भात अनेकदा पंचायतमध्ये बैठक पार पडली होती. दुसऱ्या पत्नीच्या मुलाने आपले तोंड शिवले आणि आपले हात-पाय बांधून रेल्वे ट्रकवर फेकले, असा आरोप भोलारामने केला. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर खरे काय ते समोर आले. भोलाराम हा चप्पला शिवण्याचे काम करतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.