ETV Bharat / bharat

Arrest at Darbhanga Airport : दरभंगा विमानतळावर काडतुसांसह एकाला अटक, अनेक बनावट आयडी जप्त - मॅगझिन आणि काडतुसांसह तरुणाला अटक

बिहारमधील दरभंगा विमानतळावर (Darbhanga airport) एका संशयित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. (Passenger Arrested from Darbhanga Airport). विमानतळावर तपासणीदरम्यान या व्यक्तीकडून मॅगझिन आणि काडतुसे जप्त करण्यात आली. (arrested with cartridges at Darbhanga airport). त्यानंतर त्याला विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. वाचा संपूर्ण बातमी..

Arrest at Darbhanga Airport
Arrest at Darbhanga Airport
author img

By

Published : Dec 25, 2022, 9:28 AM IST

विमानतळावर काडतुसांसह एकाला अटक

दरभंगा (बिहार) : बिहारमधील दरभंगा विमानतळावर (Darbhanga airport) मॅगझिन आणि काडतुसांसह तरुणाला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. (Passenger Arrested from Darbhanga Airport). त्याच्या बॅगेत एक मॅगझिन आणि 9 मिमीच्या तीन जिवंत काडतुसेसह अनेक कागदपत्रे सापडली आहेत. (arrested with cartridges at Darbhanga airport). अटक करण्यात आलेल्या संशयित प्रवाशाचे नाव कलामुद्दीन असे असून तो मोतिहारी जिल्ह्यातील ढाका येथील रहिवासी आहे. कलामुद्दीन शनिवारी मोतिहारीहून दरभंगा येथे आला होता. दरभंगा ते मुंबई असा प्रवास करत असताना विमानतळावर स्कॅनिंग दरम्यान त्याच्या बॅगेत एक गोळी सापडली, त्यानंतर विमानतळाच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पकडले आणि विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात दिले.

तासभर चौकशी : चौकशीअंती विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तरुणाला सदर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. तेथे एसडीपीओ सदर यांनी त्याची बराचवेळ चौकशी केली. एसडीपीओ सदर अमित कुमार यांनी सांगितले की, मोहम्मद कलामुद्दीनकडून एक मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच त्याच्याकडून अनेक प्रकारची बनावट आय कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

"मो. कलामुद्दीनकडून एक मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच त्याच्याकडून अनेक बनावट ओळखपत्रे, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, ज्यांची पडताळणी केली जात आहे."- अमित कुमार, एसडीपीओ सदर

पत्रकार असल्याचा दावा : दुसरीकडे एसडीपीओ सदर अमित कुमार यांनी सांगितले की, कलामुद्दीन स्वत:ला पत्रकार म्हणवत आहे. त्याच्याकडून प्रेस कार्ड तसेच मानवाधिकार कार्डसह अनेक प्रकारची ओळखपत्रे सापडली असून, त्याची चौकशी सुरू आहे. जप्त केलेल्या आय कार्डसह पॅनकार्डपैकी कोणते खरे आणि कोणते बनावट याची कसून चौकशी सुरू आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.