नवी दिल्ली - ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातस्थळी उपस्थित रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून चर्चा करून दुरुस्तीच्या कामाची माहिती घेतली. अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला आणि 1000 हून अधिक जण जखमी झाले.
-
#WATCH | Restoration work underway at the accident site in Odisha's #Balasore pic.twitter.com/Xr7gZzSZJV
— ANI (@ANI) June 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Restoration work underway at the accident site in Odisha's #Balasore pic.twitter.com/Xr7gZzSZJV
— ANI (@ANI) June 4, 2023#WATCH | Restoration work underway at the accident site in Odisha's #Balasore pic.twitter.com/Xr7gZzSZJV
— ANI (@ANI) June 4, 2023
रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी फोनवरून बालासोर तिहेरी रेल्वे अपघाताच्या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अपघातस्थळी उपस्थित आहेत. ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेत आहेत. तत्पूर्वी, रविवारी वैष्णव म्हणाले की, ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी पीएम मोदींनी स्वत: ओडिशातील बालासोर येथील अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांची घटनास्थळी भेट - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांनी ओडिशातील दुर्घटनेच्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला. माझे दु:ख शब्दात व्यक्त करता येत नाही. बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मी त्या सर्व लोकांचे कौतुक करतो जे चोवीस तास रेस्क्यूचे काम करत आहेत आणि मदत कार्यात मदत करतात. पंतप्रधानांसोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील पाहणी दौऱ्यावेळी उपस्थित होते.
-
#BalasoreTrainAccident | Prime Minister Narendra Modi dialled Railways Minister Ashwini Vaishnaw who is present at the site and took progress of the restoration work: Railway ministry sources
— ANI (@ANI) June 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(file pics) pic.twitter.com/ViNyeCtP7w
">#BalasoreTrainAccident | Prime Minister Narendra Modi dialled Railways Minister Ashwini Vaishnaw who is present at the site and took progress of the restoration work: Railway ministry sources
— ANI (@ANI) June 4, 2023
(file pics) pic.twitter.com/ViNyeCtP7w#BalasoreTrainAccident | Prime Minister Narendra Modi dialled Railways Minister Ashwini Vaishnaw who is present at the site and took progress of the restoration work: Railway ministry sources
— ANI (@ANI) June 4, 2023
(file pics) pic.twitter.com/ViNyeCtP7w
चौकशीचे दिले आदेश - अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बालासोर येथील फकीर मोहन हॉस्पिटलला भेट दिली, जिथे काही जखमी प्रवाशांना दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सांगितले की, अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दोषींना सोडले जाणार नाही. अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती.
हेही वाचा -
- Odisha Train Accident : तीन नाही तर एकाच ट्रेनचा झाला अपघात; रेल्वे बोर्डाची महत्वाची माहिती
- Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात; मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू, भुवनेश्वरमधील एम्समध्ये ठेवण्यात येणार 100 मृतदेह
- Odisha Train Accident : रेल्वे अपघाताचे कारण समजले..केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 'त्या' यंत्रणेवर ठेवला ठपका