ETV Bharat / bharat

Odisha Train Accident : आता मृतदेहांची ओळख पटवण्याचे आव्हान, दिल्लीहून मदतीसाठी आली विशेष टीम - Balasore

बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 250 च्या पुढे गेली आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे. मात्र आता सरकारपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यात उशीर झाल्यामुळे त्यांचे जतन करणे गरजेचे झाले होते, त्यासाठी दिल्लीहून एक विशेष पथक ओडिशात आले असून, ते आणखी काही दिवस मृतदेह जतन करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Odisha Train Accident
ओडिशा रेल्वे अपघात
author img

By

Published : Jun 5, 2023, 5:29 PM IST

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमी प्रवाशांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र आता ओडिशा सरकारसमोर मृतदेहांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आहे. काही मृतदेह बेवारस पडलेले असताना, दोन वेगवेगळ्या कुटुंबांनी एकाच मृतदेहावर दावा केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेहाची स्थिती खराब असल्याने कुटुंबीयांना त्यांना ओळखणे कठीण जात आहे.

दिल्लीहून विशेष टीम ओडिशात दाखल : मिळालेल्या माहितीनुसार, एम्स भुवनेश्वरच्या शवागारात 124 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. तर इतर 70 मृतदेह राजधानी हॉस्पिटल, सम हॉस्पिटल, आमरी हॉस्पिटल, केआयएमएस हॉस्पिटल आणि भुवनेश्वरमधील हाय-टेक हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. त्याच वेळी, आज एक विशेष टीम दिल्लीहून ओडिशात आली आहे, जी आणखी काही दिवस या मृतदेहांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हेल्प डेस्कद्वारे ओडिशा सरकारकडून सर्व मदत दिली जात आहे.

नातेवाइकांची राहण्याची व्यवस्था केली आहे : विशेष टीमने सांगितले की, 'आम्ही नातेवाईकांना मृतदेहांची छायाचित्रे आणि विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रवाशांची यादी दाखवत आहोत. एखाद्याला आपल्या प्रिय व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजल्यास, आम्ही त्याला/तिला संबंधित रुग्णालयात घेऊन जातो. त्यांनी कोणाला ओळखले तर आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करतो. याशिवाय पीडितांच्या नातेवाइकांची राहण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.'

काही समस्या आहेत ज्यांवर अद्याप काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या भीषण दुर्घटनेत मृतदेहांची ओळख पटवण्यात समस्या उद्भवते. परंतु, राज्य प्रशासन रेल्वे आणि भारत सरकारच्या अधिकार्‍यांसह संयुक्तपणे समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दिल्लीहून एक विशेष पथक आले आहे, जे आणखी काही दिवस मृतदेह जतन करण्याचा प्रयत्न करतील. - अनु गर्ग, विकास आयुक्त ओडिशा

शंभरहून अधिक मृतदेहांची ओळख पटवणे बाकी : भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृता कुलंगे यांनी सांगितले की, 'काही मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला अडचणी येत आहेत कारण मृतदेहांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आम्हाला डीएनए चाचणी करावी लागेल. मृतदेह हाताळताना डॉक्टर सर्व प्रक्रिया पाळत आहेत. आतापर्यंत 50 मृतदेहांची ओळख पटवून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अद्याप शंभरहून अधिक मृतदेहांची ओळख पटवणे बाकी आहे.

हेही वाचा :

  1. Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू
  2. Odisha Train Accident: ओडिशामध्ये पुन्हा मालगाडी रुळावरून घसरली, सुदैवाने जीवितहानी नाही!
  3. Odisha train accident : ...तर टळला असता अपघात, रेल्वे अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच यंत्रणेतील त्रुटीबद्दल केले सावध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.