ETV Bharat / bharat

Odisha Train Accident: ओडिशामध्ये पुन्हा मालगाडी रुळावरून घसरली, सुदैवाने जीवितहानी नाही! - बारगढ मेंधापाली रेल्वे दुर्घटना

ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेचे अजूनही भय संपले नाही. अशातच ओडिशामध्ये बारगढमधील मेंधापाली येथे आणखी एक रेल्वे रुळावरून घसरली. चुनखडीने भरलेल्या मालगाडीचे पाच डबे भाटली ब्लॉकमधील संभारधाराजवळ रुळावरून घसरले.

Odisha Train Accident
ओडिशा रेल्वे अपघात
author img

By

Published : Jun 5, 2023, 1:21 PM IST

भुवनेश्वर : बारगढमधील मेंधापाली येथे मालगाडी रुळावरून अपघात कसा झाला? याचे अद्याप कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

रेल्वेतील माल एका सिमेंट कंपनीच्या मालकीचा आहे. या रेल्वे मार्गाचा उपयोग केवळ चुनखडी उत्पादन हे कारखान्यापर्यंत नेण्यासाठी केला जातो. पायाभूत सुविधा खासगी सिमेंट कंपनीच्या अखत्यारीत असल्याने या अपघातामधून रेल्वेने हात झटकले आहेत. घटनेची माहिती मिळताच सिमेंट कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचा तपास सुरू केला आहे.

बालासोर अपघातात 275 जणांचा मृत्यू : शुक्रवारी संध्याकाळी बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघातात किमान 275 जणांचा मृत्यू झाला. तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. रेल्वे बोर्डाच्या दाव्यानुसार अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. याबाबत रेल्वेने प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला होता. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या माहितीनुसार प्राथमिक तपासात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे अपघात झाला आहे. अद्याप अपघाताचे नेमके कारण व जबाबदार व्यक्तींचे नाव समोर आलेनाही. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता अपघातस्थळापासून रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. अपघातानंतर 51 तासांनी ही सेवा सुरू होताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी उपस्थित होते.

अपघात होण्याचा दिला होता इशारा : सिग्नल मेंटेनन्स सिस्टिमबाबतही रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यावर तातडीने देखरेख आणि दुरुस्ती करण्याची शिफारस केली होती. त्याप्रमाणे दुरुस्ती झाली नाही तर, आणखी अपघात होऊ शकतात, असा लेखी पत्रातून सावधानतेचा इशारा दिला होता. नॉन-इंटरलॉक्ड कामांमध्ये आवश्यक नियम आणि प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने म्हटले होते. दुसरीकडे कवच यंत्रणा बसविली नसल्याने विरोधी पक्षांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मागणी करत भाजपवर हल्लाबोल केला.

हेही वाचा-

  1. Odisha Train Accident : रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पंतप्रधानांनी घेतला आढावा
  2. Odisha Train Accident : तीन नाही तर एकाच ट्रेनचा झाला अपघात; रेल्वे बोर्डाची महत्वाची माहिती
  3. Odisha train accident : ...तर टळला असता अपघात, रेल्वे अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच यंत्रणेतील त्रुटीबद्दल केले सावध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.