ETV Bharat / bharat

ओडिशाच्या रायगडाचा हा स्पेशल झाडू आता ऑनलाइनही मिळणार..! - रायगडाचा झाडू आता ऑनलाइनही मिळणार

आता जगभरातून कोणीही एका क्लिकवर, छोट्या जंगली झाडांपासून तयार केलेला हा मऊसूद झाडू खरेदी करू शकतो. यासाठी रायगडा जिल्हा प्रशासनानं अॅमेझॉनशी करार करण्याची सर्व तयारी केलीय. बारकोड प्रणालीचं उरलेलं काम पूर्ण झालं की हा झाडू.... जवळपास तीन महिन्यांच्या आत ऑनलाइन विक्रीसाठी सज्ज होणार आहे.

रायगडा
रायगडा
author img

By

Published : Apr 22, 2021, 2:51 PM IST

रायगडा (ओडिशा) - प्रत्येक घरा-घरात स्वच्छतेसाठी झाडू किती महत्त्वाचा आहे, हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरात झाडू हा असतोच. विज्ञान-तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी आजही सुंदरता आणि स्वच्छतेचं प्रतीक हा झाडूच आहे. प्रत्येक गृहिणीचा सोबती असलेला हा झाडू आता त्यांच्या कमाईचं साधनही बनलाय. ओडिसामधील रायगडाचा स्पेशल झाडू आता लवकरच प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट अ‌ॅमेझॉनवर विकला जाणार आहे.

आता जगभरातून कोणीही एका क्लिकवर, छोट्या जंगली झाडांपासून तयार केलेला हा मऊसूद झाडू खरेदी करू शकतो. यासाठी रायगडा जिल्हा प्रशासनानं अॅमेझॉनशी करार करण्याची सर्व तयारी केलीय... बारकोड प्रणालीचं उरलेलं काम पूर्ण झालं की हा झाडू.... जवळपास तीन महिन्यांच्या आत ऑनलाइन विक्रीसाठी सज्ज होणाराहे...

पूर्वी खूप कमी झाडू उपलब्ध व्हायचे आणि आम्हाला पैसेही कमी मिळायचे. आता आम्हाला चांगले प्रोत्साहन मिळत असल्याने जास्त झाडू बनवले जात आहेत. या बरोबरच आम्हाला चांगला नफाही मिळत आहे, असे मुटुका धनगदामाझी (रा. मंडीबिसी गाव) यांनी सांगितले.

आधी आम्ही कंत्राटदाराकडे जात असत. तिथे आम्हाला नियमित पैसे मिळत नव्हते. आठवड्यातून एकदाच कधीतरी पैसे दिले जायचे. परंतु, आता आम्हाला चांगले पैसे मिळत असून आम्ही आमचे कुटुंब नीट चालवत आहोत, आमच्या मुलांचे योग्य शिक्षण होत आहे. आता आम्ही आमचा झाडू कोठेही विकू शकत आहे. आम्हाला त्यातून चांगला नफाही मिळत आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत, असे ललिता नायक (रा. मंडीबिसी गाव) यांनी सांगितले.

ओडिशाच्या दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेशातील कोरापुट, कलहांडी, मलकनगिरी आणि रायगडा यासारख्या जिल्ह्यात झाडू मोठ्या संख्येनं तयार केला जातो. याभागात बहुतांश आदिवासी लोक राहतात. झाडूसाठी लागणारी सामुग्री जंगलातून गोळा केली जाते आणि नंतर ती सुकवली जाते. त्यानंतर ग्रामीण महिला किरकोळ बाजारात झाडू बनवून विकतात. या महिला निरक्षर आणि स्वभावानं साध्या आहेत, त्यामुळंच चांगल्या मार्केटिंगशिवाय अगदी कमी किमतीत झाडू विकतात. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आता या महिला स्वावलंबी झाल्या असून... तयार झाडूच्या विक्रीत वाढ झाली आहे.

हेही वाचा - राज्यात 67 हजार 468 नवे कोरोनाग्रस्त, 568 जणांचा मृत्यू

आमची उत्पादने देशाबाहेर विकली गेली, तर आम्हाला खूप आनंद होईल. आता आम्ही आमच्या उत्पादनांच्या विक्रीवर चांगला नफा मिळवत आहे. पूर्वी आम्हाला चांगला नफा मिळत नव्हता, पण आता आम्ही चांगली कमाई करू शकतो, असे गौरी गोपाल (रा. मंडीबिसी गाव) यांनी सांगितले.

बाजारात उपलब्ध असलेल्या सामान्य झाडूंपेक्षा रायगडाचे हे झाडू गुणवत्तेत बरेच चांगले आहेत. टेकड्यांमधून गोळा केलेल्या या झाडूंना डोंगरी झाडू असंही म्हणतात. आतापर्यंत आपण वापरत असलेले झाडू हे प्रामुख्यानं आसाममधून बनवलेले असतात. त्यासाठी लागणारी झाडं नद्यांच्या काठावर किंवा पाण्याच्या इतर स्त्रोतांजवळ उगवतात. हे झाडू साधारणत: दोन ते तीन महिनेच टिकतात आणि नंतर खराब होऊ लागतात. मात्र, रायगडाचे हे झाडू बराच काळ टिकून राहतात, म्हणूनच त्यांची मागणी चांगलीच वाढली आहे. यामुळंच जिल्हा प्रशासन ग्रामीण महिलांना झाडू विक्री आणि त्याचं मार्केटिंग करण्याचं प्रशिक्षणही देत आहे.

देशी झाडू असल्याने त्याची मागणी वाढली आहे. आम्ही त्यासाठीची झाडं जंगलातून गोळा करीत आहोत. वृद्ध महिलांनाही आम्ही या कामात सहभागी करून घेतोय. आम्हाला एक झाडू तयार करण्यासाठी पाच पैसे मिळतात. आम्ही हे काम सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत दररोज करतो. घरातील कामे पूर्ण केल्यावर आम्ही झाडू बनवू शकतो आणि मग मुलांनाही शाळांमध्ये सोडू शकतो. आम्हाला यातून आता चांगले उत्पन्न मिळत आहे, असे मल्लिका नायक ( गाव-बहारपड़माझी ) यांनी सांगितले.

हेही वाचा - "गुडमॉर्निंग, कदाचित ही अखेरची शुभसकाळ असेल,'' डॉ मनीषा जाधव यांची अखेरची पोस्ट

आम्ही अॅमेझॉनवर रायगडाच्या झाडूची जाहिरात करण्यासाठी आणि विक्रीसाठी ई-प्लॅटफॉर्मवर नोंदणी आधीच पूर्ण केली आहे. आम्ही इतर आणखी प्लॅटफॉर्म शोधत आहोत. पहिल्या टप्प्यात अॅमेझॉनमध्ये नोंदणी पूर्ण झाली आहे. मोठ्या मॉलमध्ये झाडू विक्रीच्या उद्देशाने आता बार कोडिंगची व्यवस्था केली जात आहे. यावर्षी आम्ही एक लाख झाडू विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे मनोज कुमार पात्रा (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ओडिशा ग्रामीण विकास, मार्केटिंग सोसायटी (ओआरएमएएस) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, अ‍ॅमेझॉन) यांनी सांगितले.

तसं पाहायला गेलं तर घरात एका कोपऱ्यात पडून असणाऱ्या या झाडूनं आदिवासींना आत्मनिर्भर बनवलंय. शिवाय स्वदेशी वस्तूंचे उत्पादनही वाढवलंय. याकामी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा निर्माण करून दिल्यास येथील झाडू देश-विदेशात प्रत्येक घरा-घरात पोहचेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.