ETV Bharat / bharat

Breast Cancer Awareness : ऑक्टोबर महिना ठरतो स्तन कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणारा - जागरूकता निर्माण करणारा

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 01 ते 31 तारखेपर्यंत पर्यंत 'स्तन कर्करोग जनजागृती महिना' साजरा (October is a breast cancer awareness month) केला जातो. वार्षिक आंतरराष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे उद्दिष्ट या आजाराविषयी जागरुकता वाढवणे आणि त्याचे कारण, प्रतिबंध, निदान आणि उपचार यासाठी संशोधनासाठी निधी उभारणे हे आहे. गुलाबी रिबन हे स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेचे आंतरराष्ट्रीय प्रतीक आहे.Good Health. Breast Cancer Awareness

Breast Cancer Awareness
स्तन कर्करोगाबाबत जागरूकता
author img

By

Published : Oct 18, 2022, 5:06 PM IST

01 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना (October is a breast cancer awareness month) साजरा केला जातो. हा संपूर्ण महिना महिलांमध्ये होणाऱ्या या विशिष्ट कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांपासून, तो कसा होतो, सर्व महिलांना त्याच्या चाचण्या आणि उपचारांबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक प्रकरणांमध्ये, असे दिसून आले आहे की लक्षणांची माहिती नसल्यामुळे, बऱ्याच स्त्रियांची जेव्हा स्थिती फार बिकट होते, तेव्हाच त्या डॉक्टरकडे जातात. पूर्वी 40 वर्षानंतरच स्तनाचा कर्करोग होतो असे म्हटले जात असताना, स्तनाचा कर्करोग विशिष्ट वयाशी संबंधित असल्याचे दिसून येत होते. परंतु आता वयाच्या 20 ते 30 व्या वर्षीही स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे समोर येत आहेत.Good Health. Breast Cancer Awareness

स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा एक प्रकार आहे. जो स्तनाच्या ग्रंथीच्या ऊतींमधील नलिकांच्या किंवा लोब्यूल्सच्या एपिथेलियम (अस्तर पेशी) मध्ये उद्भवतो. 2020 मध्ये, जगभरात 2.3 दशलक्षाहून अधिक महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. स्तनाचा कर्करोग सुमारे ५० टक्के अश्या स्त्रियांमध्ये विकसित होतो, ज्यांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे. रजोनिवृत्तीनंतर महीलांच्या शरीरात होणारे हार्मोन्सचे बदल स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची जोखीम निर्माण करते.

एका अहवालानुसार, त्वचेच्या कर्करोगाव्यतिरिक्त, अमेरिकन महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी मॅमोग्राफी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत ओळखली गेली तर त्यावर उपचार करणे सोपे जाते.

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय : स्तन हा शरीराचा एक खास भाग आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचे कार्य स्वतःच्या ऊतीपासून दूध तयार करणे आहे. हे ऊतक सूक्ष्म वाहिन्यांद्वारे स्तनाग्रांशी जोडलेले असतात. जेव्हा स्तनाच्या पेशी नियंत्रणाबाहेर जाऊ लागतात, त्या वेळी लहान कठीण कण (गाठी) रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतात किंवा स्तनाच्या ऊतीमध्ये लहान गुठळ्या तयार होतात, आणि मग ते कर्करोगाच्या रूपात विकसित होऊ लागतात.

स्तनाच्या कर्करोगाची तीन विशेष लक्षणे : 1. स्तनामध्ये अतीशय लहान (तुरीच्या डाळीच्या आकाराच्या) गाठी दिसणे हे स्तनाच्या कर्करोगाच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची लहानातील लहान गाठ जाणवल्यास ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी. यासाठी महिलांनी वेळोवेळी स्तनांची तपासणी करत राहावी.

2. जर तुम्हाला स्तनाच्या त्वचेत काही बदल होत असतील. जसे तुम्हाला त्वचेची जळजळ, लालसरपणा किंवा त्वचा काहीशी कडक होणे, त्वचेचा पोत बदलणे किंवा त्वचेमध्ये ओलेपणा इत्यादी असू शकतात. तुम्हाला सामान्य व्यतिरिक्त कोणतीही लक्षणे आढळल्यास तुम्ही सावध रहावे.

3. स्तनामध्ये कोणत्याही प्रकारची सूज दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही सूज स्तनाच्या एखाद्या भागात किंवा संपूर्ण स्तनाला आली तर लगेच सावध व्हा. जर तुम्ही बाळाला दूध पाजत नसाल, तरीही स्तनाग्रातून कोणत्याही प्रकारचा स्राव होत असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील पाच गोष्टींच्या बाबतीत सावधानी बाळगल्यास अनेक महीला स्तनाचा कर्क रोग होण्यापासुन स्वत:चा बचाव करु शकतात.

स्तनपानाची खात्री करा : नवजात बाळाला स्तनपान करवणे सोपे काम नाही. सी-सेक्शनद्वारे बाळ झाल्यानंतर अनेक वेळा माता स्तनपान टाळतात. याशिवाय, नोकरी करणाऱ्या मातांनाही वाटतं की, बाळाला स्तनपानाऐवजी वरच्या फीडवर राहिल्यास मुलासाठी चांगलं होईल. बाळाला दोन तासांत दूध पाजणे हे अवघड काम आहे. बर्याच स्त्रियांमध्ये एक मिथक देखील आहे की, मुलाला दुध पाजल्याने स्तनाची आकृती खराब बदलते. पण या सर्व चुकीच्या संकल्पणा आहेत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, जर तुम्ही आईचे दूध पुरेशा प्रमाणात बनवण्यास सक्षम असाल, तर बाळाला दूध पाजण्यास अजिबात संकोच करू नका. बाळाला दूध पाजल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहतेच, पण स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

गर्भनिरोधक गोळ्या देखील सुरक्षित नाहीत : अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, दीर्घकाळापर्यंत गर्भनिरोधक गोळ्या घेणे स्तनांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. या गोळ्या हार्मोन्सचे बदल करण्याच्या आधारे बनवल्या जातात, त्या दीर्घकाळ घेतल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यासाठी तुम्ही गर्भनिरोधकाच्या इतर साधनांचा अवलंब करू शकता. गर्भनिरोधक गोळ्या ठराविक वेळेसाठीच घ्याव्यात, त्याही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या घ्याव्यात.

लठ्ठपणा : लठ्ठपणाची भूमिका स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये कर्करोगाला प्रोत्साहन देत असली तरी, स्त्रियांमधील लठ्ठपणा हा स्तनाच्या कर्करोगाचा एक महत्त्वाचा घटक बनू शकतो. यामागील कारण म्हणजे लठ्ठपणाच्या काळात शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे केवळ स्तनच नाही तर कोणताही कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे लठ्ठपणाला प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक आहे, शरीर तंदुरुस्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

धूम्रपान-अल्कोहोल : अल्कोहोल कोणत्याही स्वरूपात आणि कोणत्याही प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाला आमंत्रण देते, त्याचप्रमाणे निकोटीन देखील कोणत्याही प्रकारे धोकादायक आहे. निकोटीनचे सेवन केल्याने कर्करोगास कारणीभूत घटक शरीरात सहज वाहून नेण्यास मदत होते. धूम्रपान आणि मद्यपान हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नशापासून दूर राहायला हवे.

विस्कळीत जीवनशैली : रात्री उशिरा पार्टी करणे, सकाळी उशिरा उठणे, भूक लागल्यावर कधीही काहीही खाणे, अशा वाईट जीवनशैलीमुळे मानवी शरीर आजारी पडते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ लागते. यासाठी तुम्ही निरोगी जीवनशैली निवडावी. वेळेवर उठण्यासोबतच व्यायामाला तुमच्या आयुष्याचा एक खास भाग बनवा. हिरव्या भाज्या-फळे व्यतिरिक्त, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले अन्न निवडा. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जितकी मजबूत असेल तितका रोग विकसित होण्याचा धोका कमी असतो. कर्करोगाच्या प्रतिबंधात देखील हे महत्वाचे आहे. कधीकधी स्तनाच्या कर्करोगाचे कारण अनुवांशिक देखील असते. कोणत्याही कारणाने कर्करोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.Good Health. Breast Cancer Awareness

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.