ETV Bharat / bharat

लखीमपूर हिंसाचार प्रकरण; केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या घरावर पोलिसांचे समन्स; दोघांना अटक

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांची चौकशी केल्याचे पोलीस महासंचालक लक्ष्मी सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. लवकुश राणा आणि आशिष पांडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांचे समन्स
पोलिसांचे समन्स
author img

By

Published : Oct 8, 2021, 4:20 AM IST

लखीमपूर खेरी - उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्राला नोटीस बजाविली आहे. ही नोटीस गृह राज्यमंत्री मिश्रा यांच्या घरावर लावण्यात आली आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यात ८ ऑक्टोबरला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आशिष मिश्रावर आरोप आहे.

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांची चौकशी केल्याचे पोलीस महासंचालक लक्ष्मी सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. लवकुश राणा आणि आशिष पांडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. भाजपचे कार्यकर्ते हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांचे स्वागत करण्यासाठी चारचाकीने जात होते. या चारचाकीने आंदोलन शेतकऱ्यांना चिरडल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-VIDEO : अशा लोकांनी कायमच पाकिस्तानला मदत केली, प्रज्ञासिंह ठाकूर यांची शाहरुख खानवर टीका

रविवारी नेमकं काय घडले होते? -

रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली. हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा-LAKHMIPUR केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करा- राकेश टिकैतांचा योगी सरकारला आठवडाभराचा अल्टीमेटम

हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे.

हेही वाचा-राहुल-प्रियंका गांधींनी अखेर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाची लखमीपूरमध्ये घेतली भेट, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.