शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल): नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना कोरोनाची लागण झाली ( Amartya Sen tests Covid positive ) आहे. मात्र, सौम्य लक्षणांमुळे सेन यांच्यावर त्यांच्या वडिलोपार्जित घरी उपचार सुरू आहेत.
संसर्ग टाळण्यासाठी भेटतही नव्हते : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सेन यावेळी लोकांना भेटतही नव्हते. सेन यांच्या घरात फक्त काही जवळच्या लोकांनाच प्रवेश दिला जात होता. ८८ वर्षीय अर्थतज्ज्ञ सेन यांना त्रास होऊ लागल्यानंतर संसर्ग झाल्याचे समोर आले. याबाबतची माहिती शुक्रवारी रात्री उशिरा मिळाली. सेन शनिवारी कोलकाता येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते.
लंडन दौरा ढकलला पुढे : अर्थतज्ज्ञ सेन 10 जुलै रोजी लंडनला जाणार होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, सेन यांची डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जात असून, सध्या त्यांची प्रकृती उत्तम आहे.