ETV Bharat / bharat

गोव्यात तीन दिवसांतच ऑक्सिजनअभावी 103 जणांचा मृत्यू; राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारले

यापुढे ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये’, असा आदेश गोवा सरकारला न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे.

High Court
हायकोर्ट
author img

By

Published : May 13, 2021, 5:05 PM IST

Updated : May 14, 2021, 11:45 AM IST

पणजी - गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा असल्यामुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी उच्च न्ययालयासमोर दिली आहे. यानंतर यापुढे ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावता कामा नये’, असा आदेश न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे. ही सुनावणी बुधवारी ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. याशिवाय गोव्यात 9, 10 आणि 11 मे या तीन दिवसांतच 103 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.

या सुनावणीला राज्याचे आरोग्य सचिव रवी धवन, प्रिन्सीपल वित्त सचिव पुनित कुमार गोयल, नगरविकास सचिव डॉ. तारिक थॉमस, गोवा मेडिकल कॉलेजचे नोडल ऑफिसर डॉ. विराज खांडेपारकर उपस्थित होते. डीन डॉ. शिवानंद बांदेकर अनुपस्थितीत असल्याचे आढळताच न्यापीठाने चौकशी केली आणि तत्काळ त्यांच्या उपस्थितीचा आदेश दिला. सरकारच्यावतीने अ‌ॅड. जनरल देविदास पांगम यांच्यासोबत अतिरिक्त सरकारी वकील दीप शिरोडकर उपस्थित होते. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मेसर्स स्कूप इंडस्ट्रिज प्रा. लि. या आस्थापनाच्यावतीने अ‌ॅड. विवेक रॉड्रिग्स तर केंद्र सरकारच्यावतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रविण फळदेसाई आणि रविराज चोडणकर उपस्थित होते.

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही

मुंबई उच्च न्यायालयासमोर कोविड संदर्भात कोविड सर्व्हिसीस गोवा या संस्थेच्या वतीने दिशा नायक सरदेसाई व सिद्धार्थ सरदेसाई यांनी याचिका सादर केली. संपूर्ण गोव्यातील रुग्णालयांसाठी रोज सुमारे 55 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा लागतो. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सर्वात अधिक मागणी आहे, पण तेवढा पुरवठा होत नाही याची कबुली डॉक्टर आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी न्यायपीठापुढे दिली. सुपर स्पेशालिटी ब्लॉकसाठी 20 हजार लिटर ऑक्सिजन पुरवठा करणारी टाकी आहे. पण त्यातून गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करता येत नाही. गोमेकॉसाठी दिवसाला 72 ट्रॉली ऑक्सिजन सिलिंडर लागतात. पण तेवढा पुरवठा होत नसल्याने 1.5 क्युबिक मिटर व 7 क्युबिक मिटरचे सिलिंडर वापरले जातात. पण हा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची माहिती उच्च न्यायालयासमोर उघड करण्यात आली.

रोज रुग्ण का मरतात ? न्यायालयासमोर आले खरे कारण

जे रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत व ज्यांना व्हेंटिलेटर मिळाले नाहीत, त्यांना हाय फ्लो नेझल ऑक्सिजन एचएफएनओ उपकरणाद्वारे दिले जाऊ शकते. अशी शेकडो यंत्रे गोमेकॉत पडून आहेत. ही यंत्रे खूप ऑक्सिजन वापरतात म्हणून त्याचा वापर केला जात नाही, अशी कबुली गोमेकॉतील डॉक्टरांनी दिली. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यावर रोज 50 पेक्षा रुग्ण का मरण पावतात हे स्पष्ट झाले. रोज गोमेकॉत 1 हजार पेक्षा जास्त सिलिंडर लागत असले तरी किमान 400 सिलिंडरचा तुटवडा भासतो, अशी माहिती उघड होताच रिकामी सिलिंडर नसल्यामुळे व सिलिंडर नेण्यासाठी वाहने नसल्यामुळे अडथळा होतो, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी एनजीओ मार्फत गोव्याबाहेरून रिकामी ऑक्सिजन सिलिंडर आणण्याची तयारी दर्शविली. तेव्हा रिकामी सिलिंडर आले तरी ते भरण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन साठा नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

हेही वाचा - आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आरोग्य खाते काढून घ्या; गोव्याचे राजकारण पेटले

जीवन जगण्याचा अधिकार हा मुलभूत अधिकार असून तिथे दुर्लक्ष करता येत नाही

भारतीय संविधानाच्या 21 व्या परिशिष्टाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार हा मुलभूत अधिकार असून तिथे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे आम्ही असहाय्य असून पुरवठा ठीक होत नाही, साधन सुविधा नाहीत, हे यापुढे ऐकून घेतले जाणार नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे यापुढे मृत्यू होता कामा नये, मृत्यूचे हे तांडव ताबडतोब थांबवा, असे न्यायपीठाने बजावले आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यास कमी पडत असल्यामुळे रुग्ण दगावतात हे मान्य करूनही एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा ब्लेम गेम खेळ चालू असून तो सहन केला जाणार नाही. यापुढे ऑक्सिजन कमी पडणार नाही याची हमी द्या आणि आजपासून यापुढे ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे रुग्ण दगावणार नाहीत याची काळजी घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

ऑक्सिजनअभावी 103 रुग्णांचा असा झाला मृत्यू

उच्च न्यायालयाने आकडेवारी मागितली तेव्हा गेल्या तीन दिवसांत गोमेकॉत ऑक्सिजनचा प्रचंड तुडवडा होता, हे उघड झाले. उच्च न्यायालयाने ही आकडेवारी आपल्या निवाड्यात नमूद केली आहे. दि. 9 मे रोजी गोमेकॉत 500 जंबो सिलिंडर कमी पडले, त्या दिवशी 33 जणांचा मृत्यू झाला. दि. 10 मे रोजी 700 सिलिंडर कमी पडले, त्या दिवशी 25 जणांचा मृत्यू झाला. 11 मे रोजी 900 सिलिंडर कमी पडले, त्यादिवशी 45 जणांचा मृत्यू झाला. सध्या 1 हजार 140 सिलिंडरची आवश्यकता आहे. पण पुरवठा नाही. आम्ही काहीच करू शकत नाही, असे हतबल होऊन उत्तर दिले जाते. काहीही करा, पण ऑक्सिजन पुरवठा कमी पडू देऊ नका. आजपासून यापुढे ऑक्सिजन नसल्यामुळे एकही मृत्यू होता कामा नये, याची खबरदारी घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

हेही वाचा - 'पीएम केअर्स' फंडातले व्हेंटिलेटर कुठायत? काही निकामी, तर काहींसाठी तंत्रज्ञच नाही...

Last Updated : May 14, 2021, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.