मोहाली: टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल ( Vice Captain KL Rahul ) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याचबरोबर त्याचा स्ट्राईक रेट खालावला आहे. ज्यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर ( KL Rahul on criticism ) आहे. त्यामुळे स्वत: केएल राहुलने सोमवारी पुढे येत टीकाकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आपले मौन सोडले ( KL Rahul broke his silence ). राहुल म्हणाला की तो सलामीवीर म्हणून सुधारण्यासाठी आणि आगामी ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये संघावर अधिक प्रभाव पाडण्यासाठी काम करत आहे.आशिया चषक 2022 मध्ये केएल राहुलला पाच सामन्यांमध्ये केवळ 132 धावा करता आल्या होत्या.
राहुलच्या स्ट्राईक रेटवरही प्रश्न उपस्थित होत ( Question marks on KL Rahul strike rate ) आहेत -
खराब फॉर्मसोबतच केएल राहुलच्या स्ट्राईक रेटवरही ( KL Rahul on strike rate ) उपस्थित झाले आहेत. केएल राहुलचा 61 टी-20 सामन्यांमध्ये सरासरी 140.91 स्ट्राइक रेट आहे परंतु त्याला अनेक प्रसंगी धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. आता केएल राहुलचा असा विश्वास आहे की कोणताही खेळाडू परिपूर्ण नसतो आणि भारतासाठी डावाची सुरुवात करताना तो विशेषतः स्ट्राइक रेट सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे.
प्रत्येकजण सुधारण्याचा प्रयत्न करत आहे - राहुल
पहिल्या टी-20 सामन्याच्या पूर्वसंध्येला राहुल म्हणाला ( KL Rahul statement ), 'हे बघा, प्रत्येक खेळाडूला काम करायचे असते. कोणीही परिपूर्ण नसतो, प्रत्येकजण स्वतःला सुधारण्यासाठी काम करत असतो. साहजिकच स्ट्राइक रेट एकूणच आधारावर पाहिले जातात. फिक्स्ड स्ट्राईक रेटवर फलंदाज खेळताना तुम्ही कधीच पाहत नाही. 200 च्या स्ट्राईक रेटने खेळणे महत्त्वाचे आहे की, 120-130 वर खेळून संघाला जिंकवणे महत्त्वाचे आहे. ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल कोणी बोलत नाही.
केएल राहुल पुढे म्हणाला, ''या गोष्टीवर मी काम करत आहे. गेल्या 10-12 महिन्यांत प्रत्येक खेळाडूला नेमून दिलेल्या भूमिका अगदी स्पष्ट आहेत. तसेच प्रत्येकजण त्या दिशेने काम करत आहे. मी फक्त एक सलामीवीर म्हणून स्वतःला कसे सुधारता येईल या दिशेने काम करत आहे. जेव्हा मी फलंदाजीला जातो तेव्हा मी माझ्या संघावर कसा प्रभाव पाडू शकतो.''
राहुलने कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकाचे केले कौतुक ( Rahul praised captain and head coach ) -
राहुलने पुढे स्पष्ट केले की, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माने एक सुरक्षित वातावरण तयार केले आहे. जेथे खेळाडू चुका करण्यास किंवा अपयशी होण्याची भीती बाळगत नाहीत. राहुल म्हणाला, 'अनेक गोष्टींवर टीका होऊ शकते. पण खेळाडूसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रेसिंग रूममध्ये त्याचा कर्णधार, प्रशिक्षक आणि सहकारी त्याच्याबद्दल काय विचार करतात. प्रत्येक खेळाडूकडून कोणत्या प्रकारची भूमिका अपेक्षित आहे हे फक्त आम्हालाच माहीत आहे. प्रत्येकजण योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्येक खेळात प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही. आम्ही असे वातावरण तयार केले आहे की खेळाडूंना चुका होण्याची किंवा अपयशाची भीती वाटत नाही.
हेही वाचा - Icc Rules Changes : आयसीसीचा मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे 'हे' नियम बदलणार