नवी दिल्ली - गेल्या वर्षी जगभरात कोरोनाचा प्रसार झाला. कोरोनामुळे प्रत्येक घटकाचे नुकसान झाले. कोरोनामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा आला. कोरोनाची अभूतपूर्व स्थिती ध्यानात घेता 2021 या वर्षी परीक्षार्थींना आणखी एक संधी वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला. 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची युपीएससी परिक्षा देण्याची संधी हुकली. त्यांन ती पुन्हा देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटलं. युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या 24 विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.