नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयी हिचा विवाह गुरुवारी, 8 जून रोजी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. बंगळुरू येथील सीतारामन यांच्या घरी लग्नाचे सर्व विधी पार पडले. माध्यमांनुसार, या लग्न सोहळ्यात एकही नेता किंवा व्हीआयपी व्यक्ती नव्हता. फक्त कुटुंबातील व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता आपण सर्वांना प्रश्न पडला असेल व्हीआयपी का नव्हता. अर्थमंत्र्यांचा जवाई काय करतो. कोण आहे त्यांचा जवाई याच प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
PMO मध्ये कामाला जवाई आहे : सीतारामन यांच्या जवाईचे नाव प्रतीक आहे. निर्मला सीतारमन यांची मुलगी परकला आणि प्रतीक यांचे लग्न ब्राह्मण परंपरेनुसार पार पडले. उडुपी अदमारू मठाच्या संतांनी विवाहाचे सर्व विधी पार पाडले. त्याचबरोबर संतांनी वधू आणि वराला आशीर्वाद दिले. सीतारामन यांचे जावई प्रतीक 2014 पासून पीएमओ कार्यालयाशी संबंधित असून ते तेथे काम करतात.
पंतप्रधान मोदींसाठी आहे खास : प्रतीक हा पंतप्रधान मोदींचा खास सहकारी आहे. त्यांच्यासोबत ते बराच काळापासून काम करत आहेत. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून प्रतीक त्यांच्या कार्यालयात संशोधन सहाय्यक म्हणून काम होते. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना पीएमओमध्ये बोलवण्यात आले. ते ऑफिसमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) अंतर्गत संशोधन आणि रणनीतीचे काम पाहतात. 2019 मध्ये त्यांना सहसचिव पद देऊन ओएसडी बनवण्यात आले.
प्रतीक आणि परकलाचे शिक्षण काय : प्रतीकने सिंगापूरमधील मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. सध्या पीएमओमध्ये ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. तर सीतारमण यांची मुलगी परकला ही एक पत्रकार आहे. ती मिंट लाउंजमध्ये फीचर लेखिका आहे. त्यांनी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. परकला यांनी दिल्ली विद्यापीठातून (DU) इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.
हेही वाचा -